भारत गौरव रेल्वे पुण्याहून दाखल तर रावसाहेब दानवे यांनी दाखवला हिरवा झेंडा

0

( सुदाम गाडेकर /जालना )

राजूर  : केंद्र सरकारच्या देखो अपना देश आणि एक भारत, श्रेष्ठ भारत उपक्रमाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या भारत गौरव रेल्वे आज पुण्यावरून रवाना झाली आहे. या रेल्वे ला केंद्रीय मंत्री  रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी पुरी-गंगासागर दिव्य काशी यात्रा भारत गौरव रेल्वेला  व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे स्टेशनवरून हिरवा झेंडा दाखवला.

पुण्यावरून रवाना झालेली भारत गौरव रेल्वे  कोलकत्ता, प्रयागराज, काशीसह अन्य भारतातील शहरांमध्ये जाणार आहे. ही रेल्वे  जवळपास ९ रात्र आणि १० दिवस चालणार आहे. या रेल्वेमध्ये विविध प्रकारच्या विविध प्रकारच्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत. तसेच IRCTC ने या टूरसाठी सर्वसाधारणासाठी १५,९०० रूपये, कन्फर्टसाठी २७,९०० रूपये आणि डिलक्ससाठी ३३,३०० रूपये अशी ती पॅकेजेस जाहीर केली आहेत.

दरम्यान, पुण्याहून पुढील भारत गौरव रेल्वे  ११ मे रोजी रवाना होईल. ती उत्तर भारतातील आग्र, अमृतसह, हरिद्वार, मथुरा, ऋषीकेश, उज्जैन आणि वैष्णो देवी मंदिर यांसारख्या धार्मिक स्थळे असलेल्या शहरांत जाणार आहेत. त्यामुळे भाविकांना धार्मिक स्थळावर दर्शन घेणे सोपे होणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here