मुंबई : भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी फादर स्टॅन स्वामी यांच्या कम्प्युटरमध्ये अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे हॅकर्सद्वारे टाकण्यात आल्याचं समोर आलं आहे.
एका अमेरिकन फॉरेन्सिक कंपनीच्या नव्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.
भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) आरोपांवर अमेरिकन फॉरेन्सिक फर्मने या अहवालावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
NIAने आपल्या चौकशीत फादर स्टॅन स्वामी आणि कथित माओवादी नेत्यांमध्ये कथित इलेक्ट्रॉनिक संवादाचे गंभीर आरोप केले होते.
फादर स्टॅन स्वामी यांच्या वकिलांनी सांभाळलेली बोस्टनस्थित फॉरेन्सिक संस्था आर्सेनल कन्सल्टिंगच्या अहवालानुसार, “तथाकथित माओवादी पत्रांसह सुमारे 44 कागदपत्रे अज्ञात सायबर हॅकरने स्टॅन स्वामी यांच्या कम्प्युटरमध्ये टाकली होती.”