मुर्टी ता, बारामती:-बारामती तालुक्यातील जिरायत भागातील शेतीसाठी बारामती तालुक्यातील राजकीय लोकप्रतिनिधींनी अनेक महत्वकांक्षी योजना आणल्या परंतु यामध्ये जिरायत भागात पुरंदर उपसा ही योजना प्रामुख्याने महत्वाची ठरली,या योजनेमुळे खडकाळ जमीन सुद्धा बागायत करण्यात शेतकर्याना काही प्रमाणात यश आले.
पुणे जिल्हा व शहरातील सांडपाणी या योजनेद्वारे जिरायत भागातील शेतीला दिले जाते .येथील शेती फक्त पावसावरच अवलंबुन असते .काही वर्षी चांगला पाऊस झाला तर शेतकरी सुखावतो पण एखाद्या वर्षी कडक दुष्काळ पडला तर शेतकरी,पशुपालक चिंताग्रस्त होत असतात .आपल्या मराठी मध्ये एक म्हण आहे “धरण उशाला कोरड घशाला” या म्हणी नुसार पुरंदर उपसाचे पाणी अगदी शेतकर्याच्या बांधावर असले तरी पुरंदर उपसा सिंचन चे अधिकारी यांच्या सुचनेप्रमाणेच शेतकरी यांना ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम दिली तरच अधिकारी पाणी सोडत असतात .त्यातून प्रामाणिक शेतकर्यानी पैसे भरले त्या शेतकर्याना पाणी मिळे पर्यंत पाणी बंद होते. मग शेतकरी पुन्हा हवालदिल होऊन जळक्या पिकांकडे पहात निराश होतो,या योजनेकडे अनेक शेतकरी,पशुपालक फार आशेने पहातात पण त्यांच्या हाती कायम निराशाच येत आहे.याचे खरे कारण शेतकर्यानी भरलेल्या पैशाचा दुरुपयोग,
व सिंचनाची देखभाल तसेच विजेची समस्या अशा अनेक प्रकारच्या समस्या उदभवत असल्याने जिरायत भागाला पुरंदर उपसा वरदान ठरेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यावर योग्य मार्ग काढण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधी व प्रशासनाने या योजनेकडे गांभिर्याने लक्ष देऊन ही योजना व्यवस्थित सुरू रहाण्यासाठी प्रयत्नशील असावे हि शेतकर्यांनी आशा व्यक्त केली.