सातारा/अनिल वीर : मेडिकल कॉलेजचे साहित्य चोरणाऱ्या बड्या भंगारवाला-दुकानदार व संबंधित अधिकाऱ्यांवरती दरोड्याचे गुन्हे दाखल करावेत.अन्यथा,आमरण उपोषण करणार असल्याचा निर्वाणीचा इशारा रिपाइं(आं)चे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी दिला आहे.
येथील शासकीय मेडिकल कॉलेजचे काम सुरू झाले असले तरी साफसफाईच्या नावावरती मेडिकल कॉलेजच्या जागेत असणाऱ्या २०० छोट्या-मोठ्या इमारती पाडण्याचे काम कोणत्याही प्रकारची निविदा न काढता सुरू केली आहे.तेथील लोखंड, लाकडे, विटा व रॅबिट चोरीला गेलेले आहे. त्यामध्ये साताऱ्यामधील दोन बड्या भंगारवाल्यांच्या माध्यमातून ही चोरी करण्यात आली आहे.त्यामध्ये त्या भंगारवाल्यांनी काही लोकप्रतिनिधीच्या बगलबच्चांना १७ लाख रुपयाला संबंधित इमारती विकत घेतल्या आहेत. हा प्रकार संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच मेडिकल कॉलेजचे डिन चव्हाण,न्याती बिल्डरचे सुपरवायझर मुल्ला व बालाजी सिक्युरिटी या सर्वांनी मिळून संगनमताने हा व्यवहार केला आहे.त्यामध्ये शासन थरावर कुठल्याही प्रकारची निविदा काढली गेली नाही. त्यामुळे संबंधित लोकांवर संघटीत दरोडा टाकल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
न्याती बिल्डर्स,पीडब्ल्यूडी अधिकारी,जलसंपदा विभागाचे अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधीचे बगलबच्चे यांनी भोसले भंगारवाल्याशी वाटाघाटी करत त्यास जेसीपी ,पोकलॅंड तसेच ट्रॅक्टर डंपर च्या साह्याने चोरी आठ दिवस अगोदर केली आहे. कोट्यावधी रुपयाचे साहित्य बंगल्याचे लोखंड,लाकडं, विटा ,प्लॅस्टिक, रॅबिट व मुरूम हे सर्व परस्पर विकलेले आहे. मागील एक वर्षांपूर्वी त्याच ठिकाणी काही भुरट्या चोरांनी चोऱ्या केल्या होत्या.त्यावेळी प्रतापसिंह नगर तसेच शेजारच्या झोपडपट्ट्यांमध्ये पोलिसांनी ऑपरेशन कोबींग करून नाहक चांगल्या लोकांना त्रास दिला होता. आता एवढ्या दिवसाढवळ्या चोऱ्या होऊन सुद्धा गुन्हे दाखल होत नसल्यामुळे संबंधितांवरती कडक कारवाई करावी. म्हणूनच आतापर्यंत अनेक आंदोलन केली होती.मात्र,कोणतीच अद्याप कारवाई झाली नसल्याने रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांसह आमरण उपोषण करणार आहोत. जोपर्यंत गोरगरिबांना सर्वसामान्य एक न्याय आणि श्रीमंत चोरांना मात्र वेगळा न्याय त्यामुळे अशा पांढरपेशी चोरांवरती दरोड्यासारखे गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती कडक कारवाई करावी.आमरण उपोषणासह तीव्र स्वरूपाची आंदोलन ही जोपर्यंत न्याय मिळत नाही.तो पर्यंत पाठपुरावा केला जाणार असल्याचाही स्पष्ट निर्वाळा ओव्हाळ यांनी दिला आहे.