सातारा : येथील संविधान गौरव परिषद व सर्व संविधानप्रेमी यांच्यावतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केलेल्या निंदनीय वक्तव्याविरोधार्थ छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आरएमएम फुटपाथवर शुक्रवार दि.२० रोजी सकाळी १०।। वा. मूक आंदोलन करण्यात येणार असून तद्नंतर जिल्हाधिकारी यांच्याकरवी मुख्यमंत्री यांनी विधानसभेत निंदाजनक ठराव मांडावा.अशा आशयाचे निवेदन देण्यात येणार आहे. तेव्हा संविधानप्रेमींनी उपस्थीत रहावे.असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांच्याबद्धल बेताल वक्तव्य केल्याबद्दल जाहीर निषेध करून आंदोलन छेडण्यात आले. शिवाय,वरील मुकआंदोलनाचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यावेळी अस्लम तडसरकर, विलास कांबळे, सुभाष सोनवणे (गांजेकर),चंद्रकांत खंडाईत, ऍड.विलास वहागावकर,गणेश कारंडे,आबा मुळीक,अनिल वीर आदी मान्यवरांसह विविध क्षेत्रातील संविधानप्रेमी उपस्थीत होते.यावेळी पोलीस कार्यालयात निवेदन देण्यात आले.