सातारा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधार्थ सातारा येथे मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन शुक्रवार दि.२७ रोजी देण्यात येणार आहे.त्या पार्श्वभूमीवर निवेदनासह चर्चेच्या फेरी पार पडल्या. जिल्ह्यातील विवीध आंबेडकरवादी विचारांच्या संघटनांच्यावतीने भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष ऍड.विजयानंद कांबळे, अनिल वीर व माणिक आढाव यांनी पोलीस अधिकारी यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सातारा शहरातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदीय सभागृहात काही कारण नसताना विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची अवहेलना करणारे वक्तव्ये केल्याने संपूर्ण विश्वातील आंबेडकरी अनुयायी यांच्या भावना दुखावल्या गेल्याने त्यांनी देशाची माफी मागावी. शिवाय, त्यांचा राजीनामा घेण्यात यावा. या व इतर मागण्याबाबत लोकशाहीच्या मार्गाने शांततेत मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.संबंधीत मोर्चात रिक्षातून स्पीकर वापरण्यात येणार आहे. तरी त्यास परवानगी मिळावी. मोर्चास योग्यते सहकार्य व्हावे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परीसरात शुक्रवार दि.२७ रोजी एकत्रीत येऊन पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.तद्नंतर शहरातून जिल्हाधिकारी कार्यालयामोर मोर्चाची सांगता होणार आहे.सरतेशेवटी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे.