दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली दि.२० रोजी रिपाइं आंदोलन करणार ! पोलिसांनी एफआयआर नोंदवला नाही : परवेज सय्यद
सातारा/अनिल वीर : वैजापूर सिन्नर तालुक्यातील पांचाळ गाव येथे सुरू असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्माचे धर्मगुरू यांच्याबाबत जे आक्षेपार्ह विधान केले आहे. ते अत्यंत निंदनीय आहे.त्याचा निषेध करीत रिपाइं जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दि.२० रोजी दुपारी १२।। वा.सर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येणार आहे.
लोकांच्या सांप्रदायिक भावना दुखवून विशिष्ट समाजामध्ये द्वेष निर्माण केला आहे.दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे व एका विशिष्ट समाजाच्या लोकांच्या धार्मिक भावना दुखावणे अशा प्रकारचे संबंधित महाराजांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत.अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या मार्फत शहर पोलीस स्टेशनकडे केली आहे.जर गुन्हा दाखल न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल. एकंदरच महंमद पैगंबर हे मुस्लिम व इतरही धर्मातील लोकांचे आदर्श आहेत. एखाद्या धर्माचे आदर्श असणाऱ्या व्यक्तीबद्दल व त्यांच्या समाजाबद्दल तिरस्कार व द्वेष पसरवणे हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे अशा या बेताल वक्तव्य करणाऱ्यासद्गुरु रामगिरी महाराज यांच्यावरती गुन्हा दाखल न झाल्यास रिपब्लिकन पक्षाच्या कायदे विभागाच्या टीमच्यावतीने न्यायालयामध्ये गुन्हा दाखल करणार आहेत.
भारतीय समाज सुरक्षेतेची भावना म्हणून व संविधानाचा आधर म्हणून आपण लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा. अन्यथा, येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पक्ष न्यायालयीन व रस्त्यावरची लढाई एकत्र लढेल. होणाऱ्या सर्वस्वी परिणामांची जबाबदारी ही शासन – प्रशासनाची राहील.असाही इशारा ओव्हाळ यांनी दिला आहे.
दरम्यान,येथील जिल्हा कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता.त्यांनी पोलीस यांच्याकडे एफआयआर दाखल करण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र, सम्बधितांनी दाखल करून घेतला नाही.अशी माहिती भगतसिंग मित्र मंडळाचे परवेज सय्यद यांनी दिली आहे.