आज अनुभव फिल्म क्लबतर्फे दिग्दर्शकाशी सुसंवाद होणार ! 

0

सातारा/अनिल वीर : गुड सिनेमा फॉर गुड लाइफ अनुभव फिल्म क्लब सातारा आयोजित माय मराठी महोत्सव २०२३ मध्ये “या गोष्टीला नावच नाही” हा चित्रपट दाखवला जाणार असून  सदर चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत यांच्याशी सुसंवाद कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला आहे.

    सदरच्या चित्रपटामध्ये जयदीप कडोलीकर, प्रथमेश अत्रे, अनुराधा धामणे आदींनी अभिनय केला असून खेड्यातील हरहुन्नरी मुकुंद नवीन स्वप्नांसह  शहरातील महाविद्यालयात  शिकायला जातो. पण त्याच्यासाठी नियतीने वेगळाच खेळ मांडलेला असतो. अशी संकल्पना असलेला चित्रपट  राजलक्ष्मी चित्रपटगृह  सकाळी ९ वा.दाखविण्यात येणार आहे. यावेळी संदीप सावंत उपस्थीत राहणार आहेत. दुपारी, ” या गोष्टीला नावच नाही. ” या चित्रपटावर दर्शकाशी सुसंवाद कार्यक्रमांमध्ये ऑस्कर पर्यंत मजल मारणारा पहिला मराठी चित्रपट श्वासचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संदीप सावंत यांच्याशी सुसंवाद कार्यक्रम दीपलक्ष्मी संस्कृती हॉलमध्ये रविवार दि.३ रोजी सायंकाळी ५ वा.आयोजित केला आहे.यावेळी क्लबचे अध्यक्ष शिरीष चिटणीस, उपाध्यक्ष ॲड.गिरीश कुलकर्णी,  सचिव राजभूषण सहस्त्रबुद्धे, सहसचिव अमित द्रविड, खजिनदार मकरंद जोशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. “गुड सिनेमा फॉर गुड लाइफ” या ध्येयाने प्रेरित होऊन  जागतिक कीर्तीच्या सृजनशील

दिग्दर्शक कलावंतांच्या अभिजात चित्रपटांचा  रसास्वाद देणारी  साताऱ्यातील  एकमेव, कलात्मक, मनोरंजक व रजत महोत्सवी सामाजिक चळवळ म्हणजे अनुभव फिल्म क्लब आहे.क्लबचे २५ वर्षे झाली असून चित्रपटाच्या माध्यमातून  सामाजिक साक्षरता, समाजाला दिशा देणारे, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखवून  जनजागृती करणारा क्लब आहे.तेव्हा दिग्दर्शकाची सुसंवाद  या कार्यक्रमाला सर्व डॉक्टरांनी तसेच सातारकर रसिक यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here