आणि वारली कलेतून डोंगर सजले

0

माण तालुक्यातील दुर्गम असलेल्या शाळेतील अनोखा स्तुत्य उपक्रम

विजय ढालपे,गोंदवले   – माण तालुक्यातील दुर्गम भागात महाराष्ट्रातील प्रसिद्ध दैवत सतोबा देवस्थानाच्या पायथ्याशी दरीत असलेल्या दरा वस्ती या जिल्हा परिषद शाळेने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना देण्याच्या उद्देशाने प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील एक अनोखा उपक्रम राबविला. सौ शुभांगी बोबडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये असलेले चित्रकलेच्या आवडीचा उपयोग करून घेऊन वारली चित्रकला मुलांना शिकवले .या चित्रकलेचा उपयोग आपण निसर्गातही करू शकतो असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी या कलेला डोंगरात साकारण्याचे ठरविले.

तशी ही शाळा दुर्गम असल्याने पटसंख्या अगदी जेमतेम १८ असून देखील त्या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून शाळेजवळच्या डोंगरातील वेगवेगळ्या मोठ्या दगडांवर चित्र काढली सतोबा देवस्थान हे प्रसिद्ध देवस्थान आहे. त्या देवस्थानासाठी येणारे भाविक आणि ग्रामस्थ यांनी या कलेचे कौतुक केले पालकांचे  आणि ग्रामस्थांचे विशेष सहकार्य  त्यांना लाभले. या उपक्रमासाठी त्यांनी खूप प्रोत्साहन दिले. त्यांनी वेगवेगळी चित्र साकारली ही चित्रे खूपच आकर्षक आणि स्वतःच्या कल्पनेतून रेखाटलेली दिसून येतात त्याचबरोबर शाळेच्या समोर अंगणात असलेल्या फरशीवर देखील प्रत्येक विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशी चित्रे काढली आहेत.

यामुळे शाळेच्या सौंदर्यत आणखीन भर पडलेली दिसून येते त्याचबरोबर वर्गांमधील सजावट देखील अत्यंत देखण्या रूपाची आहे.मुलांनी आपापल्या इंग्रजी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील चित्रांचे रूपांतर वारली चित्रकलेमध्ये केले आणि आपल्या कलेला अभ्यासाची जोड दिली या उपक्रमासाठी गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे,विस्तार अधिकारी नंदकुमार दंडिले आणि केंद्रप्रमुख साधना झणझणे  त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन कमिटी, मुख्याध्यापक अशोक गोरे यांनी त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले .या अनोख्या उपक्रमाचा व्हिडिओ Shubhangi Teacher या youtube चॅनलच्या च्या माध्यमातून प्रसिद्ध होताच सर्व स्तरातून या उपक्रमाचे भर भरून कौतुक केले गेले .त्याचबरोबर विद्यार्थ्यांवर शाबासकीचा वर्षाव झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here