आयुष्याच्या संध्याकाळी  52 वर्षानंतर भेटले  बालपणीचे वर्गमित्र..    

0

                                        

 :

             वालचंदनगर ता. इंदापूर जि. पुणे  येथील श्री वर्धमान  विद्यालयातील  30 वर्गमित्र 52 वर्षानंतर  पुणे येथे आयोजित केलेल्या स्नेह संमेलनाच्या निमित्ताने एकत्र  आले आणि शाळेतील जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला.सन 1970 साली  अकरावी पास झाल्यानंतर सर्वजण आपापल्या वाटेने पुढे चालत राहिले. 52 वर्षानंतर  एकत्र येऊन एकमेकांच्या चौकशा करत , आपापले  किस्से सांगत, शाळेतील कविता म्हणत,  गप्पा मारत खऱ्या अर्थाने वयाने ज्येष्ठ असून सुद्धा बालपणीचा आनंद अनुभवला. यातील काही जण तर पहिली पासून अकरावी पर्यंत एकाच वर्गातले आहेत. याच पद्धतीने बालपणीचा  आनंद अनुभवण्यासाठी सर्वांनी वर्षातून किमान एकदा तरी गेट-टुगेदर च्या निमित्ताने हजर राहावे अशी विनंती संयोजकांतर्फे करण्यात आली.या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल उपस्थित त्यांनी संयोजक विकास कोकीळ , नरेश दायमा, केशव क्षीरसागर आदींना धन्यवाद दिले.                             

                         यावेळी बृहन्मुंबई महानगर पालिकेचे माजी उपायुक्त ज्ञानदेव शिंदे यांना त्यांच्या  कर्तृत्वाबद्दल आणि सूर्य नमस्कारा  बद्दल आग्रही भूमिका मांडणारे आणि अजूनही  तिसीच्या उत्साहात सूर्यनमस्कार घालणारा   कार्यकर्ता रवींद्र शहा यांना यावेळी अभिमान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आयुष्याच्या संध्याकाळी अशा कार्यक्रमांची नितांत गरज ,आवश्यकता असल्याचे मत सर्व उपस्थितांनी  व्यक्त केली. ज्यांना कोणाला वैयक्तिक कारणामुळे या स्नेहसंमेलनाचा आनंद उपभोगता आला नाही त्यांनी  समाज माध्यमा वरती काहीतरी चुकलेची आपली मनातील भावना व्यक्त केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here