सातारा : सिनेरसिकांसाठी यंदाचे वर्ष देखील खूपच खास राहणार आहे. या वर्षात देखील मराठी सिनेरसिकांसाठी मनोरंजनाची खास मेजवानी असणार आहे. काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी येण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर अनेक चांगल्या कंटेट असलेल्या चित्रपटांची घोषणा केली जात आहे. नुकताच अभिनेते प्रतीक गांधी यांनी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
‘आता वेळ झाली’ या चित्रपटाची त्यांनी सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत घोषणा केली आहे. या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी हे मुख्य भूमिकेत असणार आहे.
अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित आणि लिखित ‘आता वेळ झाली’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकताच रिलीज करण्यात आले आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटामध्ये दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटाच्या नावातच अवर ग्लास दिसतोय आणि त्यातून सरत चाललेली वेळही दिसतेय. ‘इफ यू वाँट अ हॅप्पी एण्डिंग, यू मस्ट नो व्हेअर टू एण्ड युअर स्टोरी’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. या ओळीचा या चित्रपटाशी नेमका काय संबंध आहे. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला २३ फेब्रुवारी रोजी चित्रपट रिलीज झाल्यानंतर मिळणार आहे.