उत्तर कोरेगाव मध्ये वाहू लागले बदलाचे वारे

0

वाठार स्टेशन : मुकुंदराज काकडे : 

 नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये बहुतांश ठिकाणी सत्ताबदल होत असताना भागातील अनेक वर्षे प्रलंबित पाणी प्रश्नावर शाश्वत उत्तर देऊ शकणारे एकही नेतृत्व आज जबाबदारी घेताना दिसत नाही. तसेच सलग तीन टर्म एकहाती सत्ता मिळूनही पाण्याच्या बाबतीत फक्त आश्वासनांपलीकडे काहीच हाती न लागलेल्या उत्तर कोरेगावच्या जनतेला उदासीन प्रतिनिधी आणि अपंग विकासाने ग्रासलेले आहे अशीच एकंदर परिस्थिती आहे. परंतु याही परिस्थितीत भागाची दुष्काळी ओळख पुसण्यासाठी आजवर अनेक जेष्ठ व तरूण सामाजिक कार्यकर्त्यांनी निकराचे प्रयत्न केले परंतु ठोस असा उपाय हाताशी लागत नसताना, भागातील शेतकरी, गोरगरीब जनता, सुशिक्षीत बेकार तरूण यांचा कैवारी कोण असा सवाल उपस्थित होत आहे. त्यातच समाज कार्याची आवड असलेले काही तरूण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करताना दिसत आहेत.

        मा. विधानसभा सभापती कै. शंकरराव जगताप यांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या या भागात आता भारतीय जनता पार्टीचे वारे वाहू लागले असून सत्तांतरामुळे भाजपाने अनेक ग्रामपंचायतींमध्ये प्रवेश केल्याचे दिसत आहे. नवनिर्वाचित पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना ताकद देण्याचे जिल्हा कार्यकारीणी, जिल्ह्यातील आमदार तसेच खासदार यांनी केल्यास भाजपास या भागातहो येत्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूकीत यश मिळाल्यास आश्चर्य वाटणार नाही. नुकतेच भाजपा चे जिल्हा अध्यक्ष आणि विधानसभा सदस्य आ. जयकुमार गोरे यांचे निवासस्थानी काही तरूण कार्यकर्ते , पदाधिकारी आणि नवनिर्वाचित ग्रापं सदस्यांनी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यावेळी आ. गोरे यांनी येणाय्रा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत निश्चित यश मिळविण्यासाठी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आ. महेश शिंदे यांच्या साथीने विकास गंगा आणणार असल्याचे आश्वासन दिले. भागाच्या विकासासाठी ५ ते १० कोटींचा निधी तातडीने उपलब्ध करत असून त्यासाठी प्रलंबित कामांचे प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावे असेही त्यांनी सांगितले. नुकतेच रस्ता अपघातातून तब्येत सावरत असताना आलेल्या कार्यकर्त्यांना उर्जा देणाय्रा या व्यक्तीमत्वास निरोगी दिर्घायुष्य लाभावे व त्यांच्या कारकिर्दिची भरभराट एखाद्या विशालकाय वृक्षाप्रमाणे व्हावी या भावनेने भागातील भाजपाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते योगेश कर्पे, मयुर धुमाळ यांनी आ. गोरे यांना वटवृक्षाचे रोपटे भेट देऊन लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या. आ. गोरे यांच्या आश्वासनाप्रमाणेच लवकरच प्रलंबित कामांची यादी तयार करून सादर करण्याचे सांगितले. याच भेटीच्या पार्श्वभूमीवर आणि वाढदिवसाच्या निमित्ताने माढा लोकसभा मतदार संघाचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचीही भेट घेऊन भागाच्या विकासात्मक दृष्टीने वसना-वांगना योजनेतील आवश्यक बदल व विविध विकासकामांना निधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा केली. त्यावेळी येत्या २५ फेब्रुवारीला उत्तर कोरेगावचा दौरा करून वसना-वांगना योजनेची पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच या दौय्रादरम्यान शेतकरी व  कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here