अनिल वीर सातारा : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) तर्फे महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त शुक्रवार दि.११ रोजी रॅलीसह अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी दहा वाजता येथील पक्ष जिल्हा कार्यालय येथे उपस्थित राहुन महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात येणार आहे.तद्नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे महात्मा फुलेंची जयंती निमित्त केक कापून व फटाकेची आतिशबाजी करण्यात येणार आहे.
दरम्यान,जिल्हा कार्यालय पासून ते आंबेडकर पुतळा शाहू चौक या ठिकाणापर्यंत टू व्हीलर व फोर व्हीलरच्या माध्यमातून प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे.सरतेशेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.
तेव्हा सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी वेळेवर उपस्थीत रहावे.असे आवाहन जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी केले आहे.