सातारा/अनिल वीर – प्रवाशांच्या सेवेसाठी असणारी एसटीच नसेल तर प्रवाशीवर्ग त्रस्त झाला असून आगारप्रमुख यांच्या मनमानी कारभारामुळे अडचणीत उत्तरोत्तर वाढच होत आहे.
महाबळेश्वर एसटी आगारप्रमुख यांच्या मनमानी कारभारामुळे अध्यययनार्थीपासून बालवृद्धापर्यंत होतेय अडचण. लेखी – तोंडी तक्रार वारंवार करूनही उडवा उडवीची उत्तर देऊन जनतेचे हाल करीत आहेत. पूर्वीची गाडी चालू करा. असे सांगितल्यास तुमच्या गावातून ड्रायव्हर आणा. मग बस चालू करतो. अशी बेजबाबदार उत्तरे आगारप्रमुख देत आहेत. दुघगांव बस फेरी व्हाया कुमठा करून महाबळेश्वरला जायची. ती बस काही दिवस बंद केली आहे.शिवाय,हातलोट गावासाठी वरिष्ठांनी प्रत्यक्ष भेट देऊन योग्य तो निर्णय घ्यावा.पश्चिम विभागातील गाडी संदर्भात ग्रामस्थ वारंवार आगारात धडक मारतात. मात्र,त्यांना ठोस उत्तर मिळत नाही.अतिवृष्टी व कोरोना काळात सर्व काही कारणे सांगुन उडवाउडवीची उत्तरे मिळत होती. आता मात्र,रस्त्यांची डागडुजी करूनही दळणवळण नसेल तर प्रवासी वर्गाने करायचे काय ? असा यक्ष प्रश्न पडला आहे. कोरोना काळात तर गाड्या बंदचे सत्रच सुरू होते.तेव्हाही जिल्ह्यात ठिकठिकाणी गाड्या चालु करण्यासाठी अनिल वीर यांच्या नेतृत्वखाली शिष्टमंडळाने दोन-तीन वेळा जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन संबंधित आगारप्रमुखाना सूचना देऊन पूर्ववत गाड्या चालु केल्या होत्या. तेव्हा आगारप्रमुख यांनी चौकशी करण्यासाठी आलेल्या प्रवाशाबरोबर भांडण न करता अडचणीच्या ठिकाणी भेटी देऊन योग्य तो तोडगा काढावा. उंटावरून शेळ्या हाकायचे काम करू नये.आपापल्या आखत्यारीत असणाऱ्या गाड्या पूर्ववत करण्यासाठीच वारंवार ग्रामस्थ आगारात भेट देतात.मात्र,खाली हाताशिवाय पदरात काहीच पडत नाही.तेव्हा अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावर उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करावी. तर आणि तरच दळणवळण सुरळीत होऊन प्रवासी वर्गास न्याय मिळेल.