कलाविष्कार हा अभिनयातून साकारल्याने कलागुणांना संधी मिळते : अभिजित वाईकर

0

सातारा/अनिल वीर : शालेय जीवनात अद्यायनार्थ्यांनी अभ्यासक्रमाबरोबर अवांतर वाचन करणे गरजेचे आहे.सुप्त कलागुणांना संधी मिळावी.तरच व्यक्तिमत्व समृद्ध होण्यास साह्य होते.कलाविष्कार हा अभिनयातून साकारल्याने कलागुणांना अधिकाधिक संधी मिळते.असे प्रतिपादन लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस व अभिजित वाईकर यांनी केले .

     नागेवाडी-कुशी,ता.सातारा येथील लोकमंगल हायस्कूलमध्ये अभिनय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.तेव्हा उद्घाटनपर दिग्दर्शक अभिजित वाईकर व चिटणीस मार्गदर्शन करीत होते.यावेळी संचालिका शिल्पा चिटणीस,गुलाब पठाण, बाळकृष्ण इंगळे,शीलवंत आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

         शिरीष चिटणीस म्हणाले, “येणारा काळ कठीण आहे. तेव्हा आपल्या कलागुणांचा उपयोग करावा लागेल. वेगळे काहीतरी केले पाहिजे. आयुष्यात वेळ महत्त्वाची आहे. ध्येय ठरवून वाटचाल करा .वेगळ्या कामातून आनंद मिळाला पाहिजे.मोठे झाल्याचा आनंद आई-वडिलांना मिळणार आहे. वाचन करून कलागुण हस्तगत केले पाहिजे.त्यामुळे संधीचे सोने करता येईल.कार्यशाळा ही आयुष्याला कलाटणी देणारी नक्कीच ठरेल.”

       शिल्पा चिटणीस म्हणाल्या, “बोलण्यापेक्षा कृती अधिक प्रभावी आहे. कृतीला महत्त्व आहे, पथनाट्यातून समाजाला संदेश देता येतात.नाट्य वाचन, कृती,कला कौशल्य, रांगोळी, हस्तकला,अभिनय,वाचन,संगीत व चित्रकला एकमेकांशी निगडित आहेत.त्यामुळे आयुष्यात लाभ होईल.शिवाय,पुढच्या पिढीसाठी उपयोगी पडेल.”

              अभिजीत वाईकर यांनी गटचर्चा, संवाद ,खेळ आदींच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. सकारात्मक विचार ठेवावा. प्रयत्नातून अनेक कला साध्य होतात.अशीही माहिती वाईकरांनी अनेक उदाहरणाद्वारे स्पष्ट केले.मुख्याध्यापिका विद्या बाबर यांनी प्रास्ताविक केले. शशिकांत जमदाडे यांनी सूत्रसंचालन केले. भगवान जाधव यांनी आभारप्रदर्शन केले. सदरच्या कार्यक्रमास दत्तात्रय सावंत, दिलीप सावंत, रमेश महामुलकर, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व अध्ययनार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here