कलेला राजाश्रय लागतो : मुकुंद पांडे

0
फोटो : दीपप्रज्वलन करताना अनिल वीर शेजारी मुकुंद पांडे, प्रकाश गवळी,नरेंद्र पाटील,शिरीष चिटणीस व मान्यवर.

सातारा : कलेला राजाश्रय लागत  असतो.असे असले तरी सातारा नगरीत आधुनिक काळाचा वेध घेत अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणारे शिरीष चिटणीस यांच्यामुळे सर्व कलांचा कलाविष्कार होत आहे.असे गौरवोद्गार संयोजक मुकुंद पांडे यांनी काढले.

                सरगम म्युझिक लॅब्ज, मुंबई व दीपलक्ष्मी  नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा  यांच्या संयुक्त विद्यमाने  हिंदी चित्रपटातील सुवर्णकालीन गाण्याचा कार्यक्रम,”सुनहरे गीत” मैफिल येथील शाहू कलामंदिर येथे संपन्न झाला.तेव्हा पांडे मार्गदर्शन करीत होते.

               गायक व मेडिकल फर्म अधिकारी अफ़्ताब काझी, पुणे यांच्या हस्ते व डॉ.शशिकांत पवार, शिरीष चिटणीस,अनिल वीर आदींच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. अनेकांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश गवळी,विनायक भोसले,नरेंद्र पाटील,शुभम बल्लाळ, आग्नेश शिंदे,वि.ना.लांडगे,ऍड.प्रा.विलास वहागावकर आदी मान्यवर व रसिक उपस्थित होते.

       संकल्पना व दिग्दर्शन साकेत जैन यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन मुकुंद पांडे यांनी केले. या सदाबहार गीत मैफिलीमध्ये साकेत जैन, भास्कर वाळिंबे, मनोहर दुबे, वेणुगोपाल,तन्वीर सिंग, लक्ष्मीकांत अघोर, मुकुंद पांडे,सौ.प्रिया अघोर, सौ. विजया चव्हाण,सौ.दिप्ती चव्हाण-बागल आदी गायक कलाकार यांनी भाग  घेऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली होती.अलिकडील झालेल्या गाण्यांच्या मैफिलीतील सर्वोत्तम सरगमचा कार्यक्रम झाला असून अँग्री ओल्ड मॅन मनोहर दुबे मॅन ऑफ दि मॅच ठरले.शिरीष चिटणीस यांनी प्रास्ताविक केले.  निवेदन सौ. रोहिणी इनामदार यांनी करून शेवटी आभारप्रदर्शन केले.नरेश शेळके यांची कार्यक्रमास ध्वनी व्यवस्था लाभली होती. सदरचा कार्यक्रम हा विनामूल्य होता. त्यामुळे खचाखच रसिकांनी कलामंदिर हाऊसफुल झाले होते.त्यामुळे कार्यक्रमाचा आस्वाद  समस्त सातारकर रसिक श्रोते यांनी घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here