कातकरी समाजातील बांधवांच्या उन्नतीसाठी माहितीसत्र संपन्न

0

सातारा दि. 21 :   जिल्हा कौशल्य विकास, रोजगार विभाग, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामउद्योग मंडळाचे मधसंचालनालय महाबळेश्वर व यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क जकातवाडी, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील कातकरी समाजातील बांधवांना त्यांच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी तसेच त्यांना रोजगार उपलब्ध करुन त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी व त्यांना उद्योगक्षेत्रात आणण्यासाठी 19 डिसेंबर 2022 रोजी माहितीसत्राचे आयोजन करण्यात आले होते.

माहिती सत्रात जावळी तालुक्यातील दुर्गम भागातील मामुर्डी, आसनी, बीभवी व आखेगणी भागातील कातकरी बांधवांना भेट देण्यात आली. आधुनिक पद्धतीने मधमाशा पालन, मधोत्पादन करण्याबाबतची प्राथमिक माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडील योजनांची माहितीही या सत्रामध्ये देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here