प्रतिनिधी :- हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या ग्राहकास बिर्याणी मधून जिवंत आळ्या दिल्याप्रकरणी काळज, ता. फलटण येथील न्यू विरंगूळा हॉटेलला अन्न व औषध प्रशासन कार्यालयातर्फे वीस हजार रुपयांचा दंड ठरवण्यात आला आहे. या प्रकाराने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लोणंद- फलटण रस्त्यावर काळज हे गाव आहे. या ठिकाणी न्यू विरंगुळा हे हॉटेल गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. मात्र 24 ऑगस्ट 2023 रोजी तेथे जेवणासाठी गेलेल्या ग्राहकांना बिर्याणीतून जिवंत अळ्या निदर्शनास आल्या. त्याबाबत तक्रार केली असता संबंधित हॉटेल मालकाने अरेरावीची भाषा रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री.गणेश वाघमारे यांच्याशी अरेरवीचीभाषा केली तुम्हाला काय करायचे ते करा असे बेताल वक्तव्य केल्यामुळे संबंधितांनी साताऱ्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्तांकडे लेखी तक्रार केली होती, त्यानुसार न्यू विरंगुळा हॉटेल मध्ये सविस्तर तपासणी केली असता विश्लेषणासाठी घेण्यात आलेले प्रमाणित नमुने तसेच संबंधित हॉटेलच्या तपासणीमध्ये आढळलेल्या त्रुटीच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागातील न्याय निर्णय अधिकाऱ्यांकडे प्रकरण दाखल करण्यात आले होते त्यानुसार न्याय निर्णय अधिकाऱ्यांनी संबंधित आस्थापनेस ग्राहकांच्या जेवणासाठीच्या बिर्याणी मध्ये जिवंत अळ्या असल्याची खात्री पटल्याने 20,000 रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. या निर्णयाने संबंधित हॉटेल मालकासह अस्वच्छता ठेवणाऱ्या विविध धाबेमालकांचे धाबे दणाणले आहेत.