सातारा/अनिल वीर : महाबळेश्वर तालुक्यातील कासरूड-शिरवली येथील कोयना नदीवरील पूल पाडण्यास सुरुवात झाली आहे.
जेसीबी व इतर यंत्रणा सज्ज झाल्या असून काम सलग होणे गरजेचे आहे.कारण,पावसाचा आगार असलेला तालुका असल्याने पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची अडचण होता कामा नये. पर्यायी मार्गांचा रस्ता दळणवळणासाठी निर्माण केलेला आहे.त्याचा उपयोग जनतेनी करावा. असेही सम्बधितांनी आवाहन केले आहे.