कासारवाडी जि.प.शाळेतील विद्यार्थी व सर्व शिक्षक यांचे कौतुकास्पद कार्य – माणिक राऊत.

0

गोंदवले – स्व.यशवंतराव चव्हाण बाल क्रिडा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धा मध्ये यशस्वी यश संपादन केल्या बद्दल माण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी माणिक राऊत यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता यावेळी ग.शि.राऊत बोलत होते ते पुढे म्हणाले विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी सदर स्पर्धेचे आयोजन केले होते यामध्ये कासारवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी कौतुकास्पद यश संपादन केल्या बद्दल सर्वाचे अभिनंदन.

     सदर स्पर्धेत कासारवाडी शाळेतील कु.प्रिया सस्ते,प्रेमकुमार चव्हाण,सुजल सस्ते,सोहम कदम, यांनी धावणे स्पर्धेत तर साहिल सस्ते गोळा फेक मध्ये, श्रीजित जगताप व अक्षरा कदम यांनी लांब उडी मध्ये यश संपादन केले तर सांघीक स्पर्धेत खो- खो मध्ये मुले व मुली दोन्ही संघाने यश पटकविले तसेच वक्तृत्व स्पर्धेत आर्यन सस्ते व गीतमंच मध्ये मोठा गट व हस्तलिखित मध्ये मोठा गट यशस्वी तर विज्ञान प्रदर्शन मध्ये माध्य.गटात प्रथम क्रमांक मिळविला.

     शाळेच्या या यशाबद्दल ग.शि.माणिक राऊत,शिक्षण विस्तार अधिकारी सौ.सोनाली विभुते, एल.एम.पिसे, रमेश गंबरे,डायटचे अधिव्याख्याते विजय कोकरे,केंद्रप्रमुख अंकुश शिंदे,अशोक गंबरे,नारायण आवळे व कासारवाडीचे सरपंच सौ.छाया सस्ते,शा.व्य.समितीचे अध्यक्ष आकाराम सस्ते सर्व सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते या सर्वांनी शाळेचे मुख्याध्यापक महादेव दडस, पदवीधर शिक्षिका सौ.शोभा ढोक,विषय शिक्षक सुर्यकांत दडस, उ.शि.सौ.सुवर्णा जाधव,सौ.निलम जाधव व दत्ता दडस सर   व सर्व यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन केले.  उपस्थितांचे आभार मुख्या. महादेव दडस सर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here