कुष्ठरुग्ण शोध मोहिमेमध्ये सातारा जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

0

सातारा,:    कुष्ठरुग्ण शोध मोहिमेमध्ये उद्दीष्टांपेक्षा जास्त नवीन कुष्ठरुग्ण शोधणे व विविध निकषांच्या आधारे ९२.५ टक्के गुणांकन मिळवून सातारा जिल्हयाने राज्यात दुसरा क्रमांक पटकावून कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून दिनांक ७ एप्रिल २०२५ रोजी  विधान परिषद सभापती राम शिंदे,  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर, ,  सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ.विपुण विनायक,   विरेंद्र सिंह,   सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त,  अमागोथू श्री रंगा नायक, यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे पुरस्कार प्रदान करुन सातारा जिल्हयाला गौरविण्यात आले. सातारा जिल्हयाच्या वतीने हा पुरस्कार डॉ. राजेश गायकवाड, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) सातारा, डॉ. (श्रीमती) शितल सावंत, वैद्यकीय अधिकारी,  आर. जे. साबळे, एस. आर. नागपूरकर, अवैद्यकीय पर्यवेक्षक श्रीमती के. बी. गंबरे, श्रीमती सरिता पवार,  एस. के. सानप यांनी   स्विकारला.

सातारा जिल्हयाने राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत मिळावलेले हे यश, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी  संतोष पाटील  मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनामुळे मिळालेले आहे. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, सर्व वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी आणि सर्व आशा कार्यकर्ता यांच्या सकारात्मक सहकार्याने व योगदानामुळे मिळालेले आहे, अशी भावना डॉ. राजेश गायकवाड, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) सातारा यांनी व्यक्त करून सर्वांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here