सातारा : व्यवस्थेनुसार जे आरक्षण आहे.ते ठिकच आहे. मात्र,नव्याने आरक्षणाची मागणी करणे चुकीचे आहे.धर्मकांड करणाऱ्यानी ८०० वर्षे धांदात खोटेपणा करून फसवले आहे. कोरोनापेक्षाही धर्म घातक आहे. तेव्हा इतर जाती-धर्मातील समाजाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला तर २० पट प्रगती होईल. असे प्रतिपादन मराठा समाजाचे बहुजन विचारवंत लेखक चंद्रकांत फडतरे यांनी केले.
येथील सातारवासीय विविध संघटनांच्यावतीने आधुनिक नवविचार प्रणालीचे चंद्रकांत फडतरे यांचा अभिष्टचिंतनपर सत्कार करण्यात आले. बी.एल.माने यांनी पुष्पगुच्छ देऊन तर अनिल वीर यांनी पुस्तक भेट देऊन सत्कार केला. तेव्हा सत्कारास उत्तर देताना मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ट नागरिक संघाचे सरचिटणीस बी.एल.माने होते.फडतरे म्हणाले,”वर्णव्यवस्था ही चुकीचीच केली होती.छ. शिवराय,शाहु,फुले,आंबेडकर, सयाजीराव गायकवाड, बुद्ध, कबीर आदी संत-महात्मे यांच्या विचारावरच खऱ्या अर्थाने समाजरचना बदलणार आहे.तेव्हा कोणत्याही कर्मकांडास थारा देता कामा नये.” अशा अनेक प्रकारच्या उदाहरणाने फडतरे यांनी जयभीमराय म्हणत सांगता केली.
बी.एल.माने म्हणाले,”अभ्यासू व सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जाणारे फडतरे साहेब बहुजन विचारवंत आहेत. त्यांनी लिहिलेल्या ,”आपला खरा धर्म कोणता ?” या पुस्तकावर बुद्धांचा फोटो असल्याने त्यांच्या खऱ्या धर्माची ओळख होते.” अशा पद्धतीने फडतरे यांच्या जीवनातील विविध पैलूंवर माने यांनी प्रकाशझोत टाकला.यावेळी उपस्थितांनी अष्टचिंतनपर फडतरेसाहेब यांचा गुणगौरव केला.आगामी धोरणाबाबत सकारात्मक चर्चा-विनिमय झाला.यावेळी माने यांच्यासह महाराष्ट्र अंनिस वार्तापत्र सचिव प्रकाश खटावकर, होलार समाजाचे ज्येष्ट नेते दादासाहेब केंगार,पी.टी बापू,अनिरुद्ध वीर,बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर व संपूर्ण फडतरे कुटुंब व मित्रपरिवार मोठ्या संख्येनी उपस्थित होता.नरेंद्र चंद्रकांत फडतरे यांनी आभार मानले.