कौटुंबिक न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिन साजरा

0

सातारा दि. 27 : सातारा येथील कौटुंबिक न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आल्याचे कौटुंबिक न्यायालयाचे प्रभारी प्रबंधक एस.एस. देव यांनी कळविले आहे.

            या कार्यक्रमास उच्च न्यायालय मुंबई चे वरिष्ठ अधिवक्ता ॲड आर.सी.द्रविड, न्यायाधीश एल.बी.मगदुम, जिल्हा वकील बार संघाचे उपाध्यक्ष गोकुळ सारडा, कौटुंबिक न्यायालयाचे विवाह समुपदेशक डॉ. एस. जी. पांडे तसेच विधीज्ञ, पक्षकार, न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

            मराठी भाषा ही जगातील दहा नंबरची भाषा आहे तर  देशातील तीन नंबरची भाषा असून ती किती महत्त्वाची आहे याविषयी माहिती दिली. तसेच न्यायालयीन कामकाजामध्ये मराठीचा वापर जास्तीत जास्त करावा यासाठी त्यांनी कायद्यातील इंग्रजी शब्दाचे अनेक मराठी शब्द सांगून त्याबाबत त्यांनी एक शब्दकोष तयार केल्याचेही सांगितले. याविषयी त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असल्याचे वरिष्ठ अधिवक्ता ॲड आर.सी.द्रविड यांनी सांगितले.

            न्यायाधीश श्री. मगदुम यांनी मराठी भाषा न्यायालयीन कामकाजात मोठया प्रमाणात वापरणे गरजेचे आहे व न्यायदान संबंधी असणारी पुस्तके ही मराठी भाषेवर असण्यावर अधिक भर देवून मराठी भाषा ही पक्षकारासाठी कशी महत्त्वाची आहे याचे महत्‌त्व सांगितले.

            ॲड सारडा यांनी मराठी भाषा इंग्रजी माध्यमातील मुलांना समजत नाही ही खंत व्यक्त केली असे होणे हे भावी पिढीच्या दृष्टीने घातक असलयाचे सांगितले. या कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. एस. जी. पांडे यांनी  तर सुत्रसंचालन कौटुंबिक न्यायालयाचे प्रभारी प्रबंधक एस.एस. देव यांनी केले. आभार कौटुंबिक न्यायालयाचे सहाय्यक अधिक्षक सतीश क्षीरसागर यांनी  मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here