खंबाटकी घाटात अपघात; कंटेनरच झाला आडवा, वाहतूक ठप्प

0

वेळे : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात अपघात झाला. यात सातारा बाजूकडे उतरताना असणाऱ्या वेळे (ता. वाई) गावाच्या हद्दीत घाट उताराच्या तीव्र वळणावर कंटेनर आडवा झाला.भर पावसात कंटेनर महामार्ग रस्त्यावर आडवा झाल्याने काही वेळासाठी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

पुणे-सातारा महामार्गावरील खांबाटकी घाट उतरल्यानंतर वेळे गावाच्या हद्दीत पावसाच्या निसरड्या रस्त्यावर कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर जागेवरच फिरला. यावेळी कंटेनरचे तोंड विरुद्ध बाजूला झाले. सुदैवाने या अपघातात चालक बाबुराव आप्पाबा पाटणे (२२, अक्कलकोट, जि. सोलापुर) हे थोडक्यात बचावले. तसेच इतरही वाहनांचा अपघात घडला नाही.

यावेळी रस्त्यावर वाहनांची संख्या तुरळक असल्याने मोठा अनर्थ टाळला. या कंटेनरमध्ये कसलाही माल नव्हता. हा अपघात सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला. त्यानंतर भुईंज महामार्ग पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here