सातारा/अनिल वीर : सद्यस्थितीत विद्यार्थ्यांना विज्ञानदृष्टी देवून चिकित्सक नागरीक घडविण्याचे महत्त्वपूर्ण काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती करीत आहे.असे प्रतिपादन प्राचार्या सौ.छाया कदम यांनी केले. येथील सुशिलादेवी साळुंखे ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समध्ये आयोजीत केलेल्या कार्यक्रमात प्राचार्या छाया कदम अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करीत होत्या.
म.अंनिसचे मनोरंजनातून विज्ञान या कार्यक्रमात राज्य कार्यकारिणी सदस्य प्रशांत पोतदार यांनी, ” माझ्या भारत देशात, कोणी कितीही शिकला, साधं विज्ञान विसरला ! हे गीत घेवून प्रारंभ केला.प्राचार्या कदम यांच्या हस्ते पाण्याचा दिवा प्रज्वलित करून औपचारिक उद्घाटन केले. जादुटोणा विरोधी कायदा व पीपीटीद्वारे शहिद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृती जागविणा-या आठवणीसह सादर करून विद्यार्थी – विद्यार्थींनीना अंतर्मुख केले.अंगात येणे पाठीमागची कारण मिमांसा विषद करून अॅड. हौसेराव धुमाळ यांनी हातावरून जळता पलीता फिरवून प्रेक्षकांना आचंबीत केले.विद्यार्थींनीनीही अनुभूती घेतली. जिभेतून त्रिशूल आरपार करून दाखवतानाचे चमत्कारी थ्रीलही सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे दुस-या टप्प्यात लंगर सोडवणे, उभ्या दोरीवर नारळाची कवटी फिरवणे – थांबविणे, संपलेल्या गंगाजलाची कलशातून पुन:पुन्हा निर्मिती करून वितरण हे चमत्कार प्रशांत पोतदार यांनी दाखवून सर्वांना मंत्रमुग्ध केले. अंतिमतः सर्व चमत्कारामागील वैज्ञानिक स्पष्टीकरण देवून “सातत्याने चिकित्सक बुद्धी जागृत ठेवून, विज्ञानाची दृष्टी स्विकारून जीवन समृद्ध करा.” असे अवाहनही त्यांनी केले. अंतिमतः समाजोपयोगी पाच प्रतिज्ञा देण्यात आल्या.अंतिम टप्प्यात अनेक विद्यार्थींनीनी व प्राध्यापकांनी भारावून टाकणारी मनोगते व्यक्त केली.याकामी, जूनियर कॉलेज विभाग प्रमुख प्रा. मृणाल गायकवाड , प्रा. श्रीमती पुनम गुरसाळे, लोहार सर, प्रा. पवार, प्रा. विभुते सर, प्रा. मुल्ला, प्रा. कुलकर्णी, प्रा. देशमुख, प्रा. माने सर, प्रा. शेखताई व प्रा. राजेताई यांनी विशेष असे परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्रा. मिथून माने केले तर आभार प्रदर्शन प्रा. पुनम गुरसाळे यांनी मानले. कार्यक्रमाचे तांत्रिक सहकार्य म.अंनिसचे मिडिया विभाग सचिव दशरथ रणदिवे व तरूण कार्यकर्ते राजेश पुराणीक यांचे लाभले.