सातारा/अनिल वीर : छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) यांचा स्मृतीदिन असूनही नगरपालिका, जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालय यांनी कोणत्याही प्रकारे शासकीय कार्यक्रम घेऊन आदरांजली वाहिली नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. तसेच महाराजांचा जो राजवाडा सर्कल येथे पुतळा आहे. त्या परिसरातील स्वच्छ्ता सुद्धा केलेली नाही.त्यास फुलांचा हारसुद्धा घालण्यात आलेला नाही या गंभीर प्रकरणाचा आम्ही सातारा नगरपालिकेचा जाहीर निषेध करतो.अशी माहिती जिल्हाध्यक्ष तुषार विजय मोतलिंग यांनी बहुजन मुक्ती पार्टीतर्फे दिली आहे.