सातारा : आई पहिला गुरू आहे. तद्नंतर शिक्षक,महापुरुष व समाजातील विविध घटक यांचा समावेश होतो.जिजाऊंनी जसे शिवबावर संस्कार केले होते. त्याचपद्धतीने माता-पित्यानी संस्कारीक पिढी निर्माण करावी. असे प्रतिपादन अनिल वीर यांनी केले
अंतवडी,ता.कराड येथील सिध्दार्थनगरमध्ये विहाराच्या प्रांगणात सामाजीक कार्यकर्त्या कालकथीत सखूबाई विश्वनाथ माने यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमात आदरांजलीपर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष अनिल वीर बोलत होते.ते पुढे म्हणाले,
“प्रतिकुल परिस्थितीवर मात करून सखुआईंनी आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीने घडविलेले आहे.तेव्हा सर्वांनीच माता-पित्यांची अखेरपर्यंत सेवा करावी.त्यांनी जन्म दिला म्हणूनच या जगात आपण वावरत असतो.सर्वश्रेष्ठ आपला धम्म असल्याने पालन केले पाहिजे.अष्टांगमार्ग,त्रिशरण, पंचशील,२२ प्रतिज्ञा आदींचे पालन केले पाहिजे. वेळ आणि नवीन बदलानूसार पालन केले पाहिजे. धम्म लवचिक असल्याने मानवाने कोणत्याही टप्प्यावर परिवर्तन केले पाहिजे. तेव्हाच दुसऱ्यास उपदेश देण्याचा नैतिक अधिकार पोहचू शकतो.तरच, आधी केले मग सांगितलेचा प्रत्यय येईल.”
कवी आनंदा गायकवाड (मुळगाव) म्हणाले,”आई पलीकडे मामीचे नाते होते.सन १९७० पासून मामा-मामी यांना जवळुन पाहिले असल्याने त्यांचा प्रेमळ स्वभाव पाहत आलो होतो.”अनेक आठवणीसह आनंदा गायकवाड यांनी विनम्रता माता तू … या कवितेने आदरांजलीची सांगता केली.यावेळी अनेकांनी आदरांजलीपर मनोगत व्यक्त केली.
बजरंग माने यांनी आपल्या आईचा कष्टमय प्रवास कथन केला.विधिकार बौद्धाचार्य दिनकर चव्हाण यांनीही मनोगतासह संपूर्ण विधी पार पाडला.जिजाबा माने यांनी आभार मानले.सदरच्या कार्यक्रमास प्रसाद गायकवाड, सूर्यकांत झेंडे,अविनाश सोंडे, दिनकर चव्हाण,शेखर झेंडे, नातेवाईक,अंतवाडी पंचक्रोशीतील मान्यवर,उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थीत होत्या.