जिल्हा वंचिततर्फे रविवारी स्त्रीमुक्ती दिन साताऱ्यात साजरा होणार !

0

सातारा/अनिल वीर : जिल्हा वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या आदेशानुसार रविवार दि.२५ रोजी सकाळी ठीक ११ वा. येथील डॉ.आंबेडकर समाजमंदिर, राविवारपेठ येथे मनुस्मृती दहन दिन अर्थात, स्त्रीमुक्ती दिन साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा उपाध्यक्षा चित्राताई गायकवाड यांनी दिली.

                 सदरच्या कार्यक्रमास  जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, महासचिव गणेश भिसे, उपाध्यक्ष संदीप कांबळे, जावळी तालुकाध्यक्ष प्रताप सकपाळ आदींच्या प्रमूख उपस्थितीत सदर कार्यक्रम होणार आहे.तरी सर्व  महिलांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे.असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here