जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सौ.संगीता शेडगे यांचे  उपोषण सुरू !

0
फोटो : सौ.संगीता सत्यनारायण शेडगे आंदोलन करताना शेजारी मान्यवर.

सातारा/अनिल वीर: अंगणवाडी पर्यवेक्षिका पदासाठी पात्र असतानाही न्याय नाही.शिवाय, कार्यालयीन त्रुटी आणि भरतीप्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्यामुळे गेली १० वर्षे या पदापासून वंचित ठेवलेले आहे.तेव्हा न्यायालयीन लढा देणाऱ्या सौ.संगीता सत्यनारायण शेडगे या अंगणवाडी सेविकेने  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते.प्रशासनाकडून उपमुख्यकार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे यांनी लेखी दिलासा देणारे पत्र दिले असुन संबंधितांबरोबर चर्चाही चालू असून जिल्हाधिकारी निर्णय देणार आहेत. तोपर्यंत उपोषण चालूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

                जिल्हाधिकारी यांना सौ.संगीता शेडगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “तत्कालीन जिल्हाधिकारी कार्यालयातील अक्षम्य त्रुटीमुळे मी अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदापासून वंचित राहिलेली आहे. सन २०१३ मध्ये झालेल्या अंगणवाडी पर्यवेक्षिका पदासाठी घेतलेल्या भरती प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होवूनही तोंडी परीक्षेच्यावेळी मात्र १० पैकी केवळ एकच गुण देण्यात आला होता.याच वेळी काही उमेदवारांना मात्र १० पैकी १२ गुण दिले गेलेले आहेत.तर काहींना १०० पैकी १०५ गुण देण्यात आलेले आहेत. याबाबत मी मुंबई उच्च न्यायलायात २०१४ मध्ये रिटपिटीशन दाखल केली आहे. याठिकाणी उच्चन्यायालयाने लेखी परीक्षेचे गुण आहे तसेच ठेवा व तोंडी मुलाखत पुन्हा घ्यावी. असा निर्णय २०१९ मध्ये दिला होता . त्यानंतर २०१३ मध्ये या भरतीप्रक्रियेत नोकरी मिळालेल्या पर्यवेक्षिकांनी सुप्रीम कोर्टामध्ये स्पेशल लिव पिटीशन दाखल केल्याने या भरतीप्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे.मात्र, न्यायालयीन सुनावणी वेळी सरकारी वकील हजर राहत नसल्याने ही प्रक्रिया रखडली आहे.याबाबत जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशीही संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. माझी वयोमर्यादा वाढत  असून मी पदासाठी पात्र असून ही मला न्यायालयात १० वर्षे लढा द्यावा लागत आहे.यामुळे मला व माझ्या कुटूंबाला मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. माझा यामध्ये खूप वेळ खर्च होवून माझे आर्थिक  नुकसानही झाले आहे. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे मला सतत नाहक त्रास होत आला आहे.त्यामुळे माझी थेट पर्यवेक्षिका या पदावर  नेमणूक करावी. मला योग्य तो न्याय द्यावा. या मागणीसाठी मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माझी मागणी मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषणास बसणार आहे.” यावेळीं सत्यनारायण शेडगे, जयंत लंगडे,अनिल वीर,ऍड. विलास वहागावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here