जिल्ह्यातील कन्येचा दिल्लीत प्रजासत्ताकदिनी होणार सन्मान !      

0
फोटो : जान्हवी मानकुमरे यांच्यासह जगताप व मानकुमरे परिवार.(छाया-अनिल वीर)

सातारा/अनिल वीर : जिल्ह्यातील  जान्हवी मानकुमरे या कन्येचा दिल्लीत प्रजासत्ताक दिनी सन्मान होणार आहे.

                  जिल्ह्यातील जावली या डोंगरी तालुक्यातील लोक आपल्या उपजीविकेचे साधन म्हणून मुंबई,पुणे व ठाणे या ठिकाणी व्यवसाय व नोकरीच्या निमित्ताने वास्तव्य करतात. मात्र,मायभूमीला ते विसरत नाहीत.चित्रकार व पत्रकार मोहन जगताप यांच्या पत्नी भणंग च्या माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. कविता जगताप यांची बहीण नंदा या कावडी गावातील रहिवासी असून सध्या वास्तव्यास कुटुंब व्यवसायाने ठाणेस्थित आहेत. सौ.नंदा मानकुमरे यांच्या कन्या जान्हवी मानकुमरे आहेत. जान्हवीने आपल्या कलागुणांचे नृत्य प्रदर्शन सुरू करून महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक व कला संचालनालय यांच्यापर्यंत मजल मारली आहे. तिने कला सादर केली. मुळात, कलावंत म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या जान्हवीला मोहन जगताप यांचे मार्गदर्शन लाभले.या वर्षी होणार्‍या प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात महाराष्ट्रातून सादर होणार्‍या चित्ररथावरील नारी शक्ति साडेतीन विद्यापीठ या विषयावरील चित्ररथा नृत्यासाठी तिची  सांस्कृतिक कार्य संचालन विभागाने मुंबई ठाणे येथून निवड केली आहे.माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे व जावली बैंक संचालक जयश्री मानकुमरे यांची ती पुतणी आहे. या निवडीबद्दल मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, जेष्ठ नगरसेवक देवराम भोईर ,ठाणे महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष संजय भोईर,आ.रामराजे नाईक निंबाळकर, खा.श्रीनिवास पाटील,आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले व मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here