जीवन इंगळे यांना सामाजीक कार्यकर्ता पुरस्कार जाहीर

0

अनिल वीर सातारा : येथील संबोधी प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा कॅप्टन साहेबराव बनसोडे सामाजीक कार्यकर्ता १६ वा पुरस्कार काठेवाडी-बुध,ता. खटाव येथील जीवन इंगळे यांना जाहीर झाला आहे. संबोधी प्रतिष्ठानच्यावतीने पुरोगामी  विचार व चळवळीत मौलिक योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गौरवार्थ दिल्या जाणाऱ्या कॅप्टन साहेबराव बनसोडे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी, सायकलवर फिरते वाचनालय उपक्रमाचे प्रवर्तक जीवन इंगळे उर्फ  सर्वोदयी यांची निवड करण्यात आली आहे.अशी माहिती अध्यक्ष दिनकर झिंब्रे व उपाध्यक्ष रमेश इंजे यांनी दिली.

     

संबोधी प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य  स्मृतीशेष सामाजिक कार्यकर्ते कॅप्टन साहेबराव बनसोडे यांच्या जन्मदिनी बुधवार दि.२६ रोजी सायंकाळी ६ वा. समाज कल्याण विभागाचे  सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांच्या हस्ते हा पुरस्कार नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये प्रदान करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थान प्राचार्य सुरेश खराते (खंडाळा) भूषवणार आहेत.यावेळी आचार्य विनोबा भावे ट्रस्टचे विश्वस्त विजय दिवाण विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.   

               

सोळाव्या पुरस्काराचे मानकरी जीवन सर्वोदयी यांनी वडील स्वातंत्र्य सेनानी भूदान चळवळीतील कार्यकर्ते संभाजी शंकरराव इंगळे यांच्या प्रेरणेने गेले १७ वर्षे अखंडपणे  फिरते ग्रंथालय वाचक चळवळ चालवली आहे. त्यांनी या उपक्रमाद्वारे  संपूर्ण महाराष्ट्रात  आतापर्यंत ३० हजार किलोमीटरची भ्रमंती केली आहे. त्यांनी ८ हजाराच्यावर  ग्रंथ संग्रह जमवला असून केवळ एक रुपया नाममात्र आजीव सभासद फी घेऊन फिरते ग्रंथालय चालवले आहे. तसेच ते ग्रामस्वच्छता, पर्यावरण, लेक लाडकी अभियान आदी उपक्रमाद्वारे सामाजिक कार्य करत आहेत. त्यांनी सन २०१० सर्वोदय सामाजिक संस्था स्थापन केली असून मुलांचे संस्कार वर्ग चालवले आहेत.खटाव तालुक्यातील महादेव दरा राजापूर  डोंगर परिसरातील दोन एकरात गांधीग्राम उभारण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.त्यांनी ६१ वेळा रक्तदान केलेले आहे. त्यांना आतापर्यंत २४ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.याबद्धल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here