सातारा : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीत म.फुले यांच्या मदतीने शिक्षणासाठी महान असे कार्य करून खऱ्या अर्थाने शिक्षणाचे कवाडे खुले करून दिले आहेत. असे प्रतिपादन प्रा.ऍड.विलास वहागावकर यांनी केले.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुळ्याजवळ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रोत्सव संयोजन समितीचे उपाध्यक्ष ऍड. वहागावकर मार्गदशन करीत होते. अध्यक्षस्थानी धम्मबांधव उत्सव कमिटीचे अध्यक्ष शामराव बनसोडे होते.
प्रारंभी,भन्ते दिंपकर,दिलीप फणसे,शाहिर प्रकाश फरांदे,सौ. कल्पना कांबळे आदींनी डॉ. आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.भन्ते दिंपकरजी यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण विधी पार पाडण्यात आला.ज्ञानज्योती यांच्या प्रतिमेस द्राक्षा खंडकर यांच्यासह महिला व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तद्नंतर अनेक संघटनांच्या प्रतिनिधींनी दिवसभर अभिवादन केले. समता सैनिक दलातर्फे मानवंदना दिली. ज्ञानज्योती यांच्या जीवनचरित्रावर शाहिर श्रीरंग रणदिवे व सौ. कल्पना कांबळे यांनी अनुक्रमे पोवाडा व गाणी यांच्या माध्यमातून प्रबोधन केले. प्रास्ताविक अनिल वीर यांनी केले.वंचित संघर्ष मोर्चाचे महासचिव श्रीरंग वाघमारे यांनी आभारप्रदर्शन केले.सदरच्या कार्यक्रमास ज्येष्ट नेते दादासाहेब केंगार, रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत,वंचित संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष सुधाकर काकडे,राष्ट्रोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष ऍड. हौसेराव धुमाळ,पी.टी. कांबळे, कु.हर्षदा राक्षे,कु.सायली गवळी, समता सैनिक दलाचे प्रमुख अरुण पोळ,हृषीकेश तथा रावण गायकवाड,आकाश कांबळे, डी. के.क्षीरसागर,मोहन यादव,सौ. स्नेहल खरात,सौ.पूजा साळुंखे, दयानंद शिरसाट,शंकर वायदंडे, अजय सोनकांबळे, शिवनाथ जावळे,प्रकाश भोसले,शांताराम वाघमारे,दिलीप बनसोडे,हृषीकेश सौरटे,तुकाराम गायकवाड, यशपाल बनसोडे, वसंत सावंत, विविध संघटनांचे पदाधिकारी, समतासैनिक, उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.