डॉ.प्रभाकर पवार यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार प्रदान

0

अनिल वीर सातारा : राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरिक संघटना,महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक, सामाजिक व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय व भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस दिला जाणारा मानाचा पुरस्कार मुधोजी महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख व श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे व संचालक प्रा.डॉ.प्रभाकर पवार यांना विरोधी पक्ष गट नेते(विधान परिषद) सतेज उर्फ बंटी पाटील व शांतिदूत राजयोगिनी ब्रह्मकुमारी सुनंदा दीदी यांच्या हस्ते शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी प्रदान करण्यात आला.

     

सदरच्या पुरस्कार डॉ.प्रभाकर पवार व सौ.निलांगी पवार या दाम्पत्यांनी स्वीकारला. यावेळी विचार मंचावर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त रविराज येळवे, सहाय्यक कामगार आयुक्त कोल्हापूरचे विशाल घोडके, मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन कागल- हातकणंगलेचे हरिश्चंद्र धोत्रे, फॉन्ट्री क्लस्टर कोल्हापूरचे अध्यक्ष दीपक चोरगे,न्यू मेल्टिंग सेंटर प्रा.लिमिटेडचे उद्योजक मुबारक शेख,खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष भरत रसाळे व संयोजक सुरेश केसकर इ.मान्यवर उपस्थित होते.डॉ.पवार यांनी सामाजिक, शैक्षणिक कार्य करत असताना अनेक प्रश्न व विद्यार्थ्यांचे आर्थिक व बौद्धिक समस्या सोडवल्या.तसेच गावागावात जाऊन ते विविध विषयावर मार्गदर्शन करून नवीन माहिती देत असतात.संशोधन क्षेत्रात त्यांचे आतापर्यंत 75 शोधनिबंध विविध (lSSN) नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत.

ते सध्या पाच विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत मराठी पीएच.डी विषयाचे मार्गदर्शन करत आहेत.त्यांनी मणिपॉल युनिव्हर्सिटी,दुबई येथे शोधनिबंध सादर केला आहे. तो (ISBN) एन पुस्तकात प्रकाशित झाला आहे. आतापर्यंत त्यांनी दोन हजाराच्यावर विविध विषयांवर व्याख्याने दिली असून त्यांनी पर्यावरण व राष्ट्रीय एकात्मता क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.ग्रामीण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून ते मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने धडपडत असतात.  याबद्दल त्यांचे विविध स्तरातून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here