डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली धम्मक्रांती होईल !

0

सातारा: जिल्हा भारतीय बौद्ध महासभा यांच्या माध्यमातून २५ व्या धम्मषरिषदेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, कराड येथे मान्यवरांच्यास  प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. अध्यक्षस्थानी प. जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव होते. यावेळी धम्म दीक्षेचा कार्यक्रम पार पाडला. राष्ट्रीय ट्रस्टी सदस्य अरुण पोळ म्हणाले, “व्ही.आर.थोरवडे यांनी जिल्ह्यात धम्म परिषद सुरू करून धम्मचळवळ तेवत ठेवली आहे. नुसते काम करत राहण्यापेक्षा यश मिळविणे गरजेचे आहे. ऍड.डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सक्षम उभे राहूया.तरच धम्म चळवळ गतिमान होऊन क्रांती घडू शकेल.” अशाच पद्धतीने बालिकापासून मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

                    यावेळी पूज्य भन्ते बी.सारिपुत,शिबिरार्थी प्रतिनिधी, राष्ट्रीय उपाध्यक्ष एस.एस.भंडारे सचिव बी.एच. गायकवाड, राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रभारी भिकाजी कांबळे, उत्तम बोराडे गुरुजी (महाराष्ट्र राज्य अध्यक्ष) यांच्या प्रमुख उपस्थितीत रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त धम्मषरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महासभेचे दत्तात्रय मोहिते (सांगली),पिराजी सातपुते (वाई),तालुकाध्यक्ष ऍड. विजयानंद कांबळे (सातारा),व मोहन खरात (जावली),केंद्रीय शिक्षक भागवत भोसले,आप्पा अडसूळे,मिलिंद कांबळे,प्रकाश सकपाळ,बापूराव घाडगे,आप्पा कुंटे (खंडाळा),प्रियांका लादे, नितीन जाधव,व्ही.एस. गायकवाड,साहिल देवकांत, अन्नदान करणारे विजय बाळासाहेब काटरे आणि मित्रमंडळ,जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकारी,जिल्हा महिलाध्यक्षा संगीताताई मंगेश डावरे व उपासिका,वंचित, रिपब्लिकन सेना व विविध संघटनांचे प्रतिनिधी, सर्व बौद्ध बांधवांनी या धम्म परिषदेचे साक्षीदार होण्यासाठी हजेरी लावली होती.

दिलीप फणसे (जिल्हा सरचिटणीस) यांनी सूत्रसंचालन केले.सचिन आढाव (जिल्हा कोषाध्यक्ष), व्ही.आर. थोरवडे (स्वागताध्यक्ष) यांनी स्वागत केले.सुनील सपकाळ यांनी प्रास्ताविक केले.पाटण तालुकाध्यक्ष आनंदा गुजर यांनी स्वागतगीत सादर केले.प्रथमतः पाटण तालुक्यातील कलाकारांनी भीमबुद्ध गीते सादर करून वातावरण निर्मिती केली. रेश्माताई लादे यांनी, “संविधानाचे पुस्तक हातात भीमराव बसले रथात.” हे गीत गाऊन समारोप केला.भन्ते गणांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.केंद्रीय गृहमंत्री ना.अमित शहा यांनी संसदेत अवमानकारक शब्द काढल्याने जाहीर निषेध ठराव केला.त्यांनी माफी मागून राजीनामा दिला पाहिजे.असेही ठरावात नमूद करण्यात आले. याशिवाय, परभणी येथील घटनेस पोलीस प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीबाबतही निषेध करण्यात आला.या ठरावाबाबत जिल्हाध्यक्ष  अशोक भालेराव यांनी भाष्य करून कार्यवाही केली जाईल.असे स्पष्ट करीत त्यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here