दि. 16,17 जानेवारी रोजी फलटण तालुका संस्कृती महोत्सवाचे आयोजन. 

0

 फलटण, श्रीकृष्ण सातव : थिंक महाराष्ट्र डॉट कॉम आणि महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण तालुका संस्कृती महोत्सवाचे  आयोजन करण्यात आलेले आहे. दि. 16 आणि 17 जानेवारी रोजी महाराजा मंगल कार्यालय ,लक्ष्मी नगर, फलटण येथे 4 सत्रानमध्ये आयोजन करण्यात आल्याची माहिती नितेश शिंदे यांनी दिली आहे. प्रथम सत्र उद्घाटनाचे आहे. आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार  असून त्यावेळी दिनकर गांगल, मुख्य संपादक, महाराष्ट्र डॉट कॉम,  मसापचे  रवींद्र बेडकीहाळ आणि अमर शिंदे शेंडे उपस्थित राहणार आहेत

                   पहिल्या परिसंवादात ‘युवा पिढी आणि लोकशाही’ मूल्य या विषयावर मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक  अधिकारी श्रीकांत देशपांडे उपस्थित राहणार आहेत.   तर त्यांच्याशी संवाद साधणार आहेत मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.  दीपक पवार. दुसऱ्या  परिसंवादाच्या कार्यक्रमात ‘वेध स्त्री जीवनाचा’ या विषयावर गप्पागोष्टी यांचा समावेश आहे. दि. 17 जानेवारी रोजी तिसऱ्या सत्रात फलटणची उद्योग भरारी या विषयावर उद्योजक आपले विचार मांडणार आहेत. आणि त्याच दिवशी दुपारी चौथ्या परिसंवादात ‘स्थानिक मनोरंजनाच्या ग्लोबल हाका’ या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर फलटण तालुक्यातील लेखक व कवी यांच्या प्रकाशित पुस्तकांचे दालन असणार आहे त्याचे संयोजन महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे व प्रमुख कार्यवाह अमर शेंडे यांनी केले आहे.

                       थिंक महाराष्ट्र च्या वतीने महाराष्ट्राच्या सुमारे 45  हजार खेड्यातील माहिती संकलन करण्याचा मानस आहे.. त्यातील पाच  तालुक्यांवर लक्ष केंद्रित केलेले आहे.. त्यात फलटण तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राची प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे नेटवर्क ‘थिंक महाराष्ट्र- लिंक महाराष्ट्र’ अशी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here