सातारा : दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि पुस्तक पर्व ग्रंथ भांडार यांच्या संयुक्त विद्यमाने येथील दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहात
सोमवार दि.२ सप्टेंबर ते गुरुवार दि.५ सप्टेंबरपर्यंत पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ कार्यक्रम सायंकाळी ४ वा.ज्येष्ठ पत्रकार-लेखक मुकुंद फडके यांच्या शुभ हस्ते होणार आहे. यावेळी अनिल वीर,शिरीष चिटणीस आदी मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होणार आहे.
सदरच्या पुस्तक प्रदर्शनात मान्यवर प्रकाशन संस्थेची वेगवेगळ्या विषयावरची पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध असून या प्रदर्शनात पुण्यातील दिलीपराज प्रकाशन पुणे, उत्कर्ष प्रकाशन, चपराक प्रकाशन, अक्षरबंध प्रकाशन,अमित प्रकाशन, साहित्यअक्षर प्रकाशन, समकालीन प्रकाशन व इतर प्रकाशकांच्या पुस्तकांसह अन्य प्रकाशनांची लोकप्रिय तसेच दुर्मिळ पुस्तके २५ ते ४० टक्के सवलतीच्या दरात वाचक व ग्रंथप्रेमींसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
विविध विषयांवरील पुस्तकांचा समावेश असून पाच हजाराहून अधिक पुस्तके प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.तेव्हा ही मोठी सुवर्ण संधी ठरणार आहे.तेव्हा इच्छुकांनी सकाळी दहा ते रात्री आठ अशा वेळेत प्रदर्शनास भेट द्यावी. यापूर्वीही असे पुस्तक प्रदर्शन व विक्रीचा महोत्सव भरवला होता.त्यास जसा सातारकर वाचक यांचा भरघोस पाठिंबा मिळाला होता.तसाच प्रतिसाद सोमवारपासून होणाऱ्या पुस्तक प्रदर्शनास वाचकांनी द्यावा.असे आवाहनही संस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले यांनी केले आहे.