सातारा : दुधगाव पंचक्रोशीत सर्व क्षेत्रात उत्साहाने कार्यरत असणारे विठ्ठल (दादा) यादव होते. आपघाती निधन होऊन वर्ष उलटले तरीही त्यांचे नाव परिसरात आदराने घेतले जात असून विठ्ठलाचा गजर कायमच राहणार आहे. असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांनी केले. दुधगाव,ता.महाबळेश्वर येथे विठ्ठल हरिभाऊ यादव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजीत केलेल्या कार्यक्रमात पहिल्या सत्रात राजपुरे मार्गदर्शन करीत होते.अध्यक्षस्थानी डी.डी.मोरे होते. प्रथमतः विश्वशांती बुद्धविहाराच्या परिसरात बोधीवृक्षारोपण राजेंद्र राजपुरे, प्रवीण भिलारे,आनंदा उत्तेकर, अनिल वीर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.प्रवीण भिलारे म्हणाले,”बाळासाहेब भिलारे यांचा विश्वासु कार्यकर्ता विठ्ठलदादा Vitthaldada यांच्या निधनाची पोकळी भागात कधीच भरून येणार नाही.”
महामानव व कालकतथीत विठ्ठलदादा यांच्या प्रतिमेस यादव परिवार व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भीमबुद्ध गीतांची मैफिल संतोष भालेराव व सहकारी यांनी सादर केली.ढोलकीच्या साज उत्तम भालेराव यांनी दिला.दुसऱ्या सत्रात अनेकांनी विठ्ठल दादांच्या जीवनचरित्रावर प्रकाशझोत टाकला.”गावचा आवाज हरपला असून दादांनी पंचक्रोशीमध्ये केलेले कार्य अद्वितीय असून आम्ही थोरा-मोठ्याच्या विचारांवर मार्गक्रमण करू.” असे विचार शाम व शशिकांत यादव यांनी व्यक्त केले.
जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष ए.डी. भालेराव म्हणाले,”आपलेपणाने केलेल्या कामांमुळे विठ्ठलदादा कायम अजरामर राहतील.स्मृती कधीही विसरल्या जात नाहीत.” केंद्रप्रमुख दिलीप जाधव म्हणाले, “गावचे महानायक म्हणुन विठ्ठल दादांनी केलेले कार्य पंचक्रोशीला आदर्शवत स्मरणात राहील.” बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर म्हणाले, “प्रत्येकांनी आपापला गाव संघटित ठेवुन समाजाचा सर्वांगिण विकास केला पाहिजे. कोणत्याही प्रकारचे हेवेदावे नसावेत.जशी विठ्ठलदादानी अष्टपैलू कामगिरी केली होती. तसाच प्रयत्न बहुजनांच्या निर्णयांवर घ्यावा. खरोखरच,महाबळेश्वर तालुका एकसंघपणे सुख-दुःखात एकत्र येत असतो. शिवाय,नियोजनबद्ध कार्यक्रमही एका वेळेला एक घेत असतात.” यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सरचिटणीस अनिल सकपाळ,यशवन्त मोरे, संपत मोरे,डी.डी.मोरे,सुनील भालेराव, भरत कदम,सुशांत मोरे (भिलार) आदींनी आदरांजलीपर मनोगत व्यक्त केली.अभिजीत भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण विधी पार पाडला. बौद्धाचार्य विठ्ठल यादव यांनी सूत्रसंचालन केले.शिवराम यादव यांनी आभार मानले. सदरच्या कार्यक्रमास श्रीरंग मोरे-पाटील, रखमाजी यादव, एकनाथ भालेराव,सतीश भालेराव, राजाराम जाधव, अनंत रिंगे, मुख्याध्यापक लक्ष्मण जाधव, बाबूराव रिंगे,पो.पाटील अमित मोरे,प्रकाश सकपाळ, लक्ष्मण मोरे,संतोष कदम,किसन कांबळे, शरद कदम,बळवन्त कांबळे, संपूर्ण यादव कुटुंबीय, भावकी, ग्रामस्थ, महिला, पंचक्रोशीतील मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.