महाबळेश्वर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वतीने पोलिसांना निवेदन
महाबळेश्वर : परभणी येथील १० डिसेंबर च्या घटनेने संविधानावर प्रहार झाला आहे. या घटनेमागे जातीवादी शक्तींचा हात असल्याचा संशय असून सखोल चौकशी करून दोषींना प्रतिबंधक कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाबळेश्वर यांच्या वतीने महाबळेश्वर पोलीस स्टेशनला निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी आर पी आय शहराध्यक्ष विनय गायकवाड, आर पी आय महिला शहराध्यक्षा फौजीया मुलांणी,अनुजा मोहिते, वर्षा मोरे,महेश देवकुळे, मुख्तार पन्हाळकर,राजू वाघमारे उपस्थित होते.