सातारा/अनिल वीर : शिवभूषण विद्यालय लुमणेखोल रहाटणी येथील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभ संपन्न झाला.अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व सचिव भिमराव घोडके दादा होते.
प्रमुख पाहुणे राजा भगवंतराव ज्युनिअर कॉलेजचे प्रा.प्रशांत चोरगे म्हणाले,” विद्यार्थ्यांना आपल्या परिस्थितीची जाणीव असली पाहिजे. तरच ते जीवनात यशस्वी होतील.परिस्थिती ही कधीच उन्नतीच्या आड येत नाही.दारिद्रय असणे हा गुन्हा नाही. मात्र, त्या दारिद्र्यावर जर आपणास मात करता आली नाही तर आपल्या सारखा दुसरा कोणी गुन्हेगार नाही.बदलते तंत्रज्ञान स्विकारलेच पाहिजे. पण ते स्विकारताना सुसंस्कारांना कधी पायदळी तुडवता कामा नये.”
या कार्यक्रमप्रसंगी रहाटणी चे सरपंच अनिल बुवा,शेनवडीचे सरपंच रविंद्र घोडके, हणमंत थोरात,संस्थेचे संचालक संजय घोडके, संजय सुतार, बबनराव माळी , मुख्याध्यापक पिसाळ व शिक्षक-शिक्षकेतर स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमात विविध प्रकारच्या परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कदम सर यांनी केले.आणि श्रीमती थोरात मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले.