पसरणीच्या निष्ठावंत नवतरूणांचे आ. मकरंद पाटील यांच्या समोर सपशेल लोटांगण!

0

एकच वादा मदन दादा वरून दोन हाना पण मकरंद आबा पाटीलच म्हणा.. म्हणण्याची वेळ

सातारा : मागील ३ विधानसभा निवडणुकांमध्ये आमदार मकरंद पाटील हे वाई विधानसभा मतदार संघात प्रभावीपणे काम करत आहेत. मागील ३ पंचवार्षिक मधील मताधिक्य पाहता मकरंद पाटील यांचा मतांचा आलेख हा कायम चढत्या क्रमाचा राहिला. २० वर्षांच्या या कालखंडामध्ये पसरणी गावात मकरंद पाटील यांना कधीच अपेक्षित मताधिक्य मिळताना दिसले नाही. त्याचे कारण म्हणजे या ठिकाणी असणारा कट्टर आबा विरोधी आणि अतिशय चिकाटीने काम करणारा माजी आमदार मदनदादा भोसले यांचा गट. या गटाने कायम मकरंद पाटील यांना संघर्ष करायला भाग पाडले आणि लोकसभा विधानसभा जिल्हापरिषद पंचायत समिती या निवडणुकांमध्ये होणाऱ्या संघर्षात हा गट आपले वर्चस्व राखण्यात कायम यशस्वी ठरला.

नवतरुण विकास आघाडी म्हणून हा गट मागील २० वर्षांपासून आपले अस्तित्व पसरणी गावात टिकवून आहे. माजी सरपंच राजेंद्र शिर्के, भगवान पाटील, संतोष चौधरी, राजेंद्र महांगडे, किशोर महांगडे, दिपक शिर्के, समाधान महांगडे, हरिदास कायंगुडे, यादव महांगडे, सुनील महांगडे यांच्या सारखी मातब्बर मंडळी असणारा हा गट तालुक्यात मात्र नेतृत्वहीन झाला. तालुका स्तरावर प्रभावी नेतृत्वाचा असणारा आभाव याचा फटका आज या प्रतिभा संपन्न गटाला बसला आणि आज अखेर २० वर्षांनंतर या गटाला आमदार मकरंद पाटील यांच्या समोर लोटांगण घालण्याची वेळ आली. 

गावात मकरंद पाटील यांच्या विरुध्द ज्यांनी २ दशकं लोकांना भडकवत विरोध करण्यास प्रवृत्त केलं. गावातील प्रत्येक माणसाच्या मनात मकरंद पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या बाबत द्वेष निर्माण केला आज तिच मंडळी मकरंद पाटील यांच्यासाठी पसरणी गावातील जनतेला मतदान मागणार. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), भाजप, शिवसेना यांची महायुती असल्याचे कारण देत ही मंडळी मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न करणार. मात्र अश्या प्रकारच्या युत्या ही मंडळी काँग्रेस मध्ये असताना अनेक वेळा झाल्या होत्या पण तेव्हा मात्र यांनी कायम मकरंद आबा व राष्ट्रवादीच्या विरोधात काम केले होते त्यामुळे आता पसरणी गावातील मतदारांना ही मंडळी कश्या पद्धतीने मूर्ख बनवणार हे पहावे लागेल.

मदन दादा पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे आता यांना रसद पुरवणारा वालीच शिल्लक राहिला नसल्यामुळे या मंडळींना शरणागतिशिवय पर्याय राहिला नाही. त्यामुळे आपल्या प्रतिभेवर प्रचंड अहंकार असणारा हा गट अखेर आपले अस्तित्व संपवून बसला आहे हे तितकेच खरे. मात्र यामध्ये मकरंद पाटील यांचा नैतिक विजय पसरणी गावात अखेर झाला यात शंका नाही. मात्र पसरणी गावातील सुज्ञ मतदार हा या तडजोडबाज नेत्यांच्या भूलथापांना बळी पडणार की वेगळा विचार करणार हे येणाऱ्या काळात पाहायला मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here