सातारा/अनिल वीर : श्री समर्थ एज्युकेशन सोसायटी सोनवडी गजवडी संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल पिलाणी मजरे या विद्यालयात नकुतीच शिक्षक पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रास्ताविक कांबळेसर यांनी केले तर मुख्याध्यापक खरातेसर यांनी विद्यालयास येणाऱ्या अडचणीबाबत तसेच विद्यार्थीचा सर्वांगीण विकास कसा करता येईल ? याबाबत. मार्गदर्शन केले.यावेळी नव्याने शालेय समिती स्थापन करण्यात आली. विद्यार्थी उपस्थित पटसंख्या वाढवणे.अशा अनेक विषयांवर चर्चा-विनिमय करण्यात आला. आभार शिंदेसर यांनी मानले. सदरच्या कार्यक्रमास वायदंडेसर, संस्थेचे संचालक दिलीप साळुंखे (बापू) व रामचंद्र साळुंखे (आबा), शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.