पुसेगाव :
पुसेगाव मधून जाणारा सातारा पंढरपूर मार्ग अजूनही अपूर्ण अवस्थेतच आहे. डॉक्टर जाधव यांचे हॉस्पिटल पासून ते सेवागिरी मंदिरापर्यंत या रस्त्याचे काम तसेच सोडून दिलेले आहे, गेली पाच वर्ष हा रस्ता कशाना कशा कारणास्तव, या रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत आहे.सध्या पुसेगाव येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सेवागिरी महाराजांचा यात्रोस्तव दिनांक 25 पासून सुरू होत आहे, गेल्या चार वर्षापासून या यात्रेनिमित्त या रस्त्याची तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी केली जाते. आणि पंधरा दिवस किंवा महिन्यानंतर पुन्हा तो रस्ता खराब होऊन त्याच अवस्थेत राहतो.
या रस्त्याच्या कॉर्नर पासून अनेक वेळा गटाराचे पाणी रस्त्यावरून मंदिरासमोरून वाहत असते. गेल्या चार वर्षापासून या ठिकाणी लाखो रुपये तात्पुरत्या रस्त्यासाठी घालवले जातात, या रस्त्याचे काम मेगा इंजिनिअरिंग प्रायव्हेट कंपनी लिमिटेड यांच्याकडे आहे. परंतु अंतर्गत प्रश्न असल्याने हा रस्ता तसाच पडून आहे. हा प्रश्न गेली चार वर्षे झाले सुटेनासा झालेला आहे.हा प्रश्न सुटत नसेल तर त्या ठिकाणी चांगले पक्के डांबरीकरण करून हा रस्ता डॉक्टर जाधव यांचे हॉस्पिटल पासून सेवागिरी मंदिरापर्यंत करण्यात यावा अशी अनेक ग्रामस्थांची मागणी आहे.
या ठिकाणी रस्ता खराब असल्याने व अरुंद मोठा कॉर्नरही असल्याने या ठिकाणी वारंवार वाहतुकीची कोंडी होत असते, पुसेगावचे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मंदिर असून देखील हा रस्ता या ठिकाणी होत नाही ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल, आता फक्त दहा दिवसांवरच यात्रा राहिली असून, यात्रे पूर्वी तरी हा रस्ता चांगल्या पद्धतीने डांबरीकरण करून घ्यावा अशी संतप्त मागणी पुसेगाव सह परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
[ या रस्त्याच्या अर्धवट अवस्थेला चार वर्षे पूर्ण झाली अंतर्गत प्रश्न सुटेना त्यामुळे रस्ता अडकून पडला आहे. श्री सेवागिरी महाराज यात्रेपूर्वी प्रत्येक वर्षी लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी तात्पुरता रस्ता केला जातो,परंतु तो काही दिवसातच उघडला जातो, आता या ठिकाणी रस्ता होऊ किंवा नाही, परंतु अंतर्गत प्रश्न सुटेपर्यंत या ठिकाणी बांधकाम विभागाने पक्के व मजबूत डांबरीकरण करावे,….राम जाधव]