फलटण :
फलटण तालुक्यातील 14 गावात पोलीस पाटील भरती प्रक्रिया होणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे. फलटण तालुक्यात 125 पोलीस पाटील पदे मंजूर असून111 पदी पोलीस पाटील कार्यरत आहेत.फलटण उपविभागात पोलीस पाटील रिक्त पदासाठी यापूर्वी भरतीच्या वेळी आरक्षण सोडत निश्चित केलेली आहे. त्या आरक्षण सोडतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
होळ अनुसूचित जमाती सर्वसाधारण, खामगाव अनुसूचित जमाती महिला, सासकल अनुसूचित जमाती सर्वसाधारण, अलगुडेवाडी अनुसूचित जमाती सर्वसाधारण, फडतरवाडी अनुसूचित जमाती महिला ,वडगाव भटक्या जमाती ब महिला, तरडफ भटक्या जमाती ड महिला, कुरवली खुर्द अनुसूचित जमाती सर्वसाधारण, ठाकूरकी अनुसूचित जाती महिला, भाडळी बुद्रुक अनुसूचित जमाती सर्वसाधारण, जाधव वाडी विशेष मागास प्रवर्ग महिला,कोराहळे भटक्या जमाती ड सर्वसाधारण, कोपर्डी भटक्या जमाती ड सर्वसाधारण, तडवळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक महिला या आरक्षणा नुसार पोलीस पाटील भरती प्रक्रिया कार्यवाही केली जाणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी सातारा यांनी आदेश दिलेले आहेत,