फलटण .
प्रतिवर्षीप्रमाणे आयोजित केले जाणारे राज्यस्तरीय धर्मवीर संभाजी साहित्य संमेलन यंदा 27 फेब्रुवारी रोजी फलटण मध्ये आयोजित करण्यात आलेले आहे.. या संमेलनाच्या अध्यक्षपदी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक तसेच महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डिंग चे लेखक जगन्नाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. ऍग्रोन्युजचे अध्यक्ष प्रकाश सस्ते, कार्याध्यक्ष प्रा.नितीन नाळे,सदस्य मा.ज्ञानेश्वर देशमुख यांच्या समितीने ही निवड जाहीर केली आहे. मा.ना.रामराजे निंबाळकर यांचेपंच्याहत्तराव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधुन हे संमेलन भव्य दिव्य करण्याचे ठरले आहे.संमेलनाचे हे सहावे वर्ष आहे..
हे संमेलन दि.27 फेब्रुवारी रोजी फलटण येथे होणार असून ग्रंथ दिंडी, संमेलन उद्घाटन, परिसंवाद ,कथाकथन ,कवी संमेलन ,पुरस्कार वितरण अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांनी दिली.साहित्यिक जगन्नाथ शिंदे यांनी शंभरहून अधिक पुस्तके लिहिली असून त्यांनी आता पर्य़त त्यानी सोळशी येथील राज्यस्तरीय संमेलन, फलटण येथिलराज्यस्तरीय नाट्य संमेलन, माण दुष्काळी राज्यस्तरीय साहित्य संमेलनव अनेक कविसंमेलनाचे अध्यक्षपद भुषविलेली आहेत.त्यांच्या निवडीचे साहित्य क्षेत्रातून स्वागत केले जात आहे.