फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलनास प्रारंभ

0

विचारवेध” या पुस्तकाचे वितरण

सातारा : छ.शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात भोर येथे १० व्या राज्यस्तरीय फुले,शाहू, आंबेडकर विचार- प्रसार साहित्य संमेलनास जोशपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला आहे. ध्वजारोहण,संविधान रॅली तद्नंतर संपादक सम्राट फडणीस यांच्या हस्ते उदघाटन झाले.अध्यक्षस्थानी डॉ.अभिजीत होसमनी होते.यावेळी डॉ.मिलिंद मेश्राम व डॉ.अमोल देवळेकर यांचेही मार्गदर्शन झाले.करणार आहेत.ग्रंथदालन उद्घाटन कश्यपदादा साळुंके यांच्या हस्ते झाले.अध्यक्षस्थानी प्रसाद शिंदे होते.

विचारवेध :  रविवार दि.१५ रोजी सकाळी १०।। वा.खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. अध्यक्षस्थान बंधुत्व साहित्यरत्न डॉ.शरद गायकवाड भूषवणार असून महामानवांच्या प्रकाशवाटांचा विचारवेध या लिखित पुस्तकावर अध्यक्षीय भाषण होणार आहे. “विचारवेध” हे पुस्तक प्रा.डॉ.गायकवाड यांनी लिहिले आहे.त्यावरच ते प्रकाशझोत टाकतील. यावेळी डॉ. ज्ञानदेव मस्के,रामदासजी काकडे, संग्रामदादा थोपटे, चंद्रकांतदादा जगताप व महादेव मोरे उपस्थीत राहणार आहेत.

पुरस्कार वितरण : यावेळी ज्येष्ट साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते,” दिवंगत खासदार बाबासाहेब साळुंके स्मृती सन्मान पुरस्कार” डॉ.नितीन राऊत (माजी मंत्री) यांना तर रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील (सातारा) यांना,” छ.शाहु महाराज – पिलर ऑफ एज्युकेशन” प्रदान करण्यात येणार आहे.याशिवाय, प्राचार्य डॉ. वौशाली प्रधान व  मुख्याध्यापक लक्ष्मण भांगे यांना विशेष सन्मानीत करण्यात येणार आहे. 

 

 “जागर संविधानाचा” या कार्यक्रमात दुपारी २।। वा.काव्य नाट्य संगीतमय आंबेडकर जलसा संपन्न होणार असून सादरकर्ते शिरीष पवार,हर्षद कांबळे,प्रवीण डोणे आणि सहकलाकार,मुंबई.सायंकाळी ४ वा.समारोपप्रसंगी प्राचार्य – प्राचार्या डॉ.वृषाली रणधीर,डॉ. गुरुनाथ फगरे,डॉ.संजय कांबळे, डॉ.प्रकाश पवार,डॉ.मेघना भोसले, डॉ.प्रमोद धिवार व डॉ.गौतम बनसोडे उपस्थीत राहणार आहेत.तेव्हा संबंधितांनी सर्व कार्यक्रमास उपस्थीत रहावे. असे आवाहन संयोजन समितीतर्फे अध्यक्ष राहुल गायकवाड,कार्याध्यक्ष डॉ. रोहिदास जाधव,प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख,प्राचार्य डॉ.संभाजी मलघे व डॉ.इम्रान खान या निमंत्रकांनी केले आहे.

   दरम्यान,डॉ.शरद गायकवाड यांचा बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांच्या हस्ते संविधान प्रस्ताविकेचे प्रत व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी विचारवेध या पुस्तकाचे वितरण उपस्थितांना करण्यात आले. विजय पवार,दशरथ रणदिवे, भगवान रणदिवे,प्रकाश खटावकर आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थीत होते. यावेळी डॉ.गायकवाड यांच्याबरोबर संमेलनासंदर्भात चर्चा-विनिमय करण्यात आला.शाहु गायकवाड यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here