सातारा : विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलेल्या अनुयायीपैकी रुक्मिणीनाणी होत्या.त्यामुळे अशा अनुयायीना भेटणे सुखद अनुभव असतो.अशा अनेक मान्यवरांनी आपापल्या प्रतिक्रिया आदरांजलीपर व्यक्त केल्या. गोडोली (सातारा) येथील जेतवन बुद्धविहाच्या प्रांगणात कालकाथीत रुक्मिणीबाई (नाणी) बाबुराव मस्के यांचा पुण्यानुमोदनचा कार्यक्रम संपन्न झाला.तेव्हा विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनी उपस्थीत होत्या.
सामाजिक नेते विजय थोरवडे (कोयनानगर) म्हणाले,”बाबासाहेबांना जवळुन पाहणारे नाणी यांना मला मात्र प्रत्यक्ष भेटता न आल्याने माझे दुर्दैव समजतो.नाणींच्या मुलाकरवी चळवळीचे केंद्र नाणींमुळेच घरातुन चालले होते.तेव्हा आजच्या पिढीने चळवळीला पाठबळ दिले पाहिजे.नाणींच्या सहवासामुळे मोठे भाग्य मस्केवस्तीला लाभले आहे.नाणींच्या अनेक सद्गुणांपैकी काही गुण आत्मसात करणे गरजेचे आहे. तेव्हा प्रत्येकांनी धम्माप्रमाणे जगले पाहिजे.”
धम्मशील चॅरिटेबल ट्रस्टचे विलास कांबळे म्हणाले, “बाबासाहेब व आताची पिढी यांच्यामधील दुवा म्हणुन नानीकडे पाहिले जाते.तेजोमय बाबासाहेब यांचे दर्शन नाणीने घेतले होते.सातारा परिसरातील चळवळीचे काम हे नाणींच्या घरातुन चालत असल्याने ते सांस्कृतिक घरच होते.” प्रा.रमेश मस्के म्हणाले, “नाणींचा मस्के वस्तीतील वावर हा आमच्यासाठी प्रेरणादायी होता. नाणींच्यामुळेच बाबासाहेबाबद्धलच्या जवळुन पाहिल्या गोष्टी त्या उपासीकेना सांगत होत्या.”
विद्या मस्के म्हणाल्या, “नाणी या आमच्या काठीच होत्या.आम्ही आमच्या आईला नाणीच म्हणत असल्याने दोन्ही नाणी या आमच्या आईच होत्या.आईचे महत्व मोठे असते.निखळ प्रेम देणारी ती आईच असते.” अशाच प्रकारचे आदरांजलीपर मनोगत नारायण जावलीकर व अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाहिलेल्या आणि त्यांच्या विचाराला अनुसरून धम्माच्या वाटेवर प्रवास करणाऱ्या नाणी होत्या.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विचार स्वतःच्या जीवन व्यहरात त्यांनी जोपासला होता.जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले.त्यावेळी असंख्य स्त्रियांना सोबत घेऊन अंतयात्रेत त्या सहभागी झाल्या होत्या. जुन्या पिढीतल्या आणि विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पाहिलेल्या नाणी यांची शेवटची पिढी आहे.दीड वर्षांपूर्वी अनिल वीर यांनीही घरी जाऊन नाणींबरोबर संवाद साधला होता.तेव्हा त्यांचे ज्येष्ट चि. वामनदादा व त्यांचा सर्वच परिवार उपस्थीत होता.
भारतीय बौद्ध महासभेतर्फे आबासाहेब दणाने, नंदकुमार काळे आदींच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण विधी पार पाडला.वामन व चंद्रकांत मस्के या बंधुबरोबरच मस्के कुटुंबीय व त्यांच्या बहिणींनी कालकथित नाणी व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सदरच्या कार्यक्रमास मंगेश डावरे,प्रा.रमेश जाधव,प्रतीक गायकवाड,शामराव बनसोडे, विजय गायकवाड, मिलिंद कांबळे,हरिदास जाधव गुरुजी, अनिल वीर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, उपासक-उपासिका,मस्के परिवार,नातलग व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.