सातारा : बालमनापासूनच प्रतिकूल परिस्थिती बाबासाहेब यांनी पाहिली होती.मात्र,त्यांनी सर्वच पातळीवर अभ्यास करीत करीत परिस्थितीवर मात केली व मोठे झाले.शिक्षण तर जगात जास्तीचे असणारे घेतले. सर्वच क्षेत्रातील कार्य महान केलेले आहे. सर्वांगसुंदर आधुनिक समाज निर्माण केला. म्हणूनच ते सर्वश्रेष्ठ ठरले.असे प्रतिपादन बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांनी केले.
संभाजीनगर (कर्मवीरनगर) येथील जीवन सहकारी गृहनिर्माण संस्थेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.तेव्हा प्रमुख पाहुणे म्हणून अनिल वीर मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सौ.आशाताई उमेश कांबळे होत्या.
अनिल वीर म्हणाले, “बाबासाहेबांनी एका जाती-धर्मातील समूहासाठी कार्य केले नव्हते तर सर्वच समाज घटकासाठी कार्य केलेले आहे. जगात सर्वश्रेष्ठ विस्तृत अशी सर्व समावेशक असणारी राज्यघटना दिली आहे.त्यामुळे कोण्ही काहीही म्हटले तरी संविधान कोण्हीही बदलणार नाही.हेच सत्य असून युनिव्हर्सल आहे. मात्र,संविधान प्रेमी यांनी गाफील राहुनही चालणार नाही.जोपर्यंत चंद्र-सूर्य आहे.तोपर्यंत बाबासाहेब यांचे संविधान राहणार आहे. मात्र, कलम बदल करण्यासाठी जो बहुमताचा आकडा पार करण्यासाठी विरोधक धडपडत असतील तर त्यांना आवर घालण्याची किमया लोककसभेच्या मताद्वारे आपणास आहे.तेव्हा आपले मत फक्त वाया घालवू नये.” असे स्पष्ट करीत अनेक उदाहणेही वीर यांनी दिली. बाबासाहेबांनी केलेल्या अनेक चळवळी व कार्य यावर त्यांनी भाष्य केले.
नितीन गायकवाड म्हणाले, “बाबासाहेबांनी शिक्षणाचा उपयोग सर्वात मोठी लोकशाही संविधानाच्या माध्यमातून निर्माण केली आहे.” अध्यक्षस्थानावरून बोलताना सौ.आशाताई कांबळे म्हणाल्या, “बाबासाहेबांनी केलेले कार्य अलौकिक स्वरूपाचे श्रेष्ठ ठरले आहे.जगभर मान्यताप्राप्त पावलेलेले महामानव यांनी संविधानही श्रेष्ठच दिले आहे.तेव्हा दिलेल्या मताचा अधिकारही योग्य उमेदवारासाठी केला पाहिजे. दिलेल्या समता,स्वातंत्र्य व बंधुत्वाचा विचार समाजात प्रस्थापित केला पाहिजे.”
यावेळी बालिका व अनेक मान्यवरांनी मागोगत व्यक्त केली. सौ. अंजना पन्हाळे यांनी संविधान प्रस्ताविका पाठ असलेली खड्या आवाजात म्हटली.शिवाय,संविधान चौकटीत राहुनच आनंददायी सामाजिक व्यवहार करावा.असेही पन्हाळे मॅडम यांनी विविध उदाहरणाद्वारे स्पष्ट केले. प्रथमतः डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अनिल वीर यांनी अर्पण करून दीपप्रज्वलन केले.तद्नंतर कर्मवीर भाऊराव पाटील,म. ज्योतिबा फुले,छ.शाहु महाराज, भ.गौतम बुद्ध,छ. शिवराय आदी महापुरुषांच्या प्रतिमांनाही मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.सर्व विधी सौ.व श्री विजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडला.विजय गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक करून प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.महेश कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.सौ.अस्मिता कांबळे यांनी आभारप्रदर्शन केले. सदरच्या कार्यक्रमास अनिल साळवे,संजय यादव,मंदाकिनी किर्तीकुडाव,मनीषा अमोल येवले,जयसिंह माने,सुशांत गायकवाड,सुचिता गायकवाड, उत्तम किर्तीकुडाव, आबासाहेब कांबळे, दिनकर नाईक,नितीन गावकवाड,अंकिता कांबळे, सुचिता कांबळे,संस्थेचे संचालक, सभासद,नागरिक, युवक,युवती, उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.