भर पावसात जागृतीचा विस्तव तेवत ठेवला !

0

अनिल वीर सातारा : बुध्दांच्या विचार प्रेरणेतून क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. तो दिवस म्हणजे २४ सप्टेंबर १८७३.या दिनाला १५१ वर्षे होत आहेत. यानिमित्ताने साताऱ्यातून सत्यशोधक समाजाच्या झेंड्याची मिरवणूक काढण्याचा निर्धार परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी चार दिवसांपूर्वी व्यक्त केला होता. तो निर्धार या वर्धापनदिनाच्या अनुषंगाने ‘सत्यशोधक’ अनुयायांनी पूर्ण केला. महात्मा जोतीराव फुले, सवित्रीमाई फुले यांचा विचारप्रवाह अधिक ताकदीने पुढे यावा. एकूणच सर्व युगनायकांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा मिळावा. जागृतीचा विस्तव तेवत रहावा. यासाठी भर पावसात लोक रस्त्यावर उतरले होते.

छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूलच्या प्रवेशद्वारात प्रारंभी लोकराजा राजर्षी शाहू महाराज हायस्कूलमधील विद्यार्थींनींनी गीतातून जिजाऊंना वंदन केले. नंतर महात्मा जोतीराव फुले, सावित्रीमाई फुले यांचा जयघोष करून मिरवणूक सूरू झाली. वरून पाऊस कोसळत असताना जयघोष थांबला नाही. उलट चौकाचौकात महात्मा फुल्यांच्या विविध अखंडाचे पठन करण्यात आले. मिरवणूक जसजशी पुढे सरकत होती तसतशी सत्यशोधक कार्यकर्ते त्यात सहभागी होत होते. पोवईनाका येथे मिरवणून आल्यानंतर जयघोष आणखी गगनभेदी झाला आणि जोतिराव फुल्यांनी जगातील पहिली जयंती ज्यांची साजरी केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन मिरवणूकीचा समारोप झाला. एकंदर भर पावसात सत्यशोधक विचाराच्या कार्यकर्त्यांनी जागृतीचा विस्तव विझू दिला नाही, तर तेवत ठेवण्याचे काम केले.

       

यावेळी दत्ताजीराव जाधव, भारत लोकरे, चंद्रकांत खंडाईत, नारायण जावलीकर,  प्रा. अजित गाढवे, डॉ. मृणालिनी आहेर, ॲड. वर्षा देशपांडे, ॲड. राजेंद्र गलांडे, प्रा, संजीव बोंडे, विक्रांत कदम, ॲड. शैला जाधव, एम. डी चंदनशिवे, प्रमोद, क्षीरसागर, सुशांत गायवाड, शशिकांत सुतार, जनार्दन घाडगे, वैभव गवळी, प्रकाश फरांदे, प्राचार्य संपतराव यादव, कैलास जाधव या आणि अशा अनेक कार्यकर्त्यांनी विचारांच्या झेंड्याच्या मिरवणूकीत आपला सहभाग नोंदवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here