भोर येथे होणाऱ्या फुले-आंबेडकर साहित्य संमेलनाचे खा. चंद्रशेखर आझाद उद्घाटक तर अध्यक्षपदी डॉ.शरद गायकवाड 

0

अनिल वीर सातारा : बंधुत्व साहित्यरत्न तथा महावीर महाविद्यालयाच्या मराठी विभागात कार्यरत असणारे प्रा.डॉ.शरद गायकवाड यांची भोर येथे शनिवार दि .14 व रविवार दि. 15 डिसेंबर या दोन दिवसीय संपन्न होणाऱ्या दहाव्या राज्यस्तरीय फुले, शाहू, आंबेडकर विचार- प्रसार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.अशी माहिती डॉ. रोहिदास जाधव यांनी दिली. 

        उद्घाटन नवी दिल्ली येथील खा. चंद्रशेखर आझाद यांच्या हस्ते होणार असून कार्य साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून कर्मवीर विद्यापीठ भाऊराव पाटील विद्यापीठ साताऱ्याचे कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के तसेच नाशिक येथील ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार संपादक उत्तम कांबळे हे उपस्थित राहणार आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू अनिल पाटील यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज पिलर ऑफ एज्युकेशन या विशेष राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

            या साहित्य संमेलनामध्ये संविधान रॅली, ग्रंथदालनाचे उद्घाटन ,जागर संविधानाचा हा काव्य, नाट्य, संगीत, आंबेडकरी शाहिरी जलसा तसेच निमंत्रितांचे कवी संमेलन अशा भरगच्च कार्यक्रमांनी हे संमेलन संपन्न होणार आहे.

       यापूर्वी,कुलगुरू डॉ.नागनाथ कोत्तापल्ले,डॉ.श्रीपाल  सबनीस, उत्तम कांबळे, लहू कानडे, डॉ. रावसाहेब कसबे, हरी नरके, डॉ. सुखदेव थोरात, रजिया पटेल, माजी खासदार श्रीनिवास पाटील यांसारख्या मान्यवरांनी साहित्य संमेलनाची अध्यक्षपदे भूषवलेली आहेत.

   

डॉ.शरद गायकवाड हे महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीवर तज्ञ सदस्य म्हणून जसे कार्यरत आहेत तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रकाशन संस्था,बार्टी, पुणे यांच्या सत्यशोधक अण्णाभाऊ साठे ग्रंथ प्रकाशन समितीवर देखील तज्ञ सदस्य म्हणून कार्यरत आहेत. डॉ गायकवाड यांनी यापूर्वी राज्यपाल व मुख्यमंत्री नियुक्त तज्ञ सदस्य म्हणून शासनाच्या लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगावर देखील कार्य केलेले आहे.डॉ. गायकवाड हे सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते म्हणून गेली चार दशकांपासून महाराष्ट्रभर कार्यरत आहेत. नामांतर चळवळी बरोबरच दलितांच्यावर होणाऱ्या अन्याय ,अत्याचाराच्या विरुद्ध आंदोलन, मोर्चे, उपोषण, घेराव, निदर्शने त्यांनी केलेली आहेत. वाटेगाव येथील अण्णा भाऊ साठे स्मारक प्रश्नावर  त्यांनी केलेले आंदोलन विशेष उल्लेखनीय आहे. पोतराजांचे जटा निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती अभियान, जातीअंत चळवळ, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, संविधान जागृती यासंबंधी गेली चार दशके ते महाराष्ट्रभर प्रबोधनात्मक  व्याख्यानांच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य करीत आहेत.

            साहित्य आणि संस्कृती, मातंगांची शौर्यगाथा, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि अण्णा भाऊ साठे, ॲट्रॉसिटी ॲक्ट ,अण्णा भाऊंचा भाऊ: शंकर भाऊ साठे,जागतिकीकरण आणि मराठी साहित्य, जागतिकीकरण आणि परिवर्तनवादी चळवळी, बहुजनांचा प्रबोधनकार :मा.ता. मोरे ,बहुजनवादी साहित्य: क्रांतीच कुळ आणि बंडाचे मूळ यांसारख्या सामाजिक विषयावरील संशोधन ग्रंथांचे लेखन डॉ. शरद गायकवाड यांनी केलेले आहे.

 साहित्य संमेलनाचे उद्घाटन नवी दिल्ली येथील खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या हस्ते होणार असून कार्य साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून कर्मवीर विद्यापीठ भाऊराव पाटील विद्यापीठ साताऱ्याचे कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के तसेच नाशिक येथील ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार संपादक उत्तम कांबळे हे उपस्थित राहणार आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू अनिल पाटील यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज पिलर ऑफ एज्युकेशन या विशेष राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

   डॉ.शरद गायकवाड यांनी आज अखेर रशिया, थायलंड, भूतान, दुबई ,मॉरिशस ,मलेशिया आणि श्रीलंका येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमधून महापुरुषांच्या जीवन कार्य व तत्वज्ञानावर आधारित व्याख्याने दिलेली आहेत व संशोधन पेपर सादर केलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here