मंत्रीमहोदयांच्यामुळे डॉ.आंबेडकर स्मारक चार मजली होणार !

0

अनिल वीर सातारा :  शंभूराज देसाई (पर्यटन मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या प्रयत्नातून पाटण येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची इमारत चार मजली होणार आहे. इमारत बांधणे,तळमजला ग्राउंड फ्लोअर पार्किंग सुविधा, पहिला मजला हॉल,दुसरा मजरा मूर्तीप्रतिष्ठापणा व विपशना, ध्यानसाधना खोली तयार करणे, घुमट स्तूप स्तंभ व इतर यासाठी सूबक व रुबाबदार डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक बांधणीसाठी मंत्रीमहोदय यांनी विकासाचा निधी उपलब्ध केला आहे.

याबाबत इमारतीचे सर्व्हे, मोजमाप, इंस्टिमेन्ट पाटीलसाहेब (बांधकाम अभियंता, पुणे) यांनी आर्किटेक्चर यांच्यासोबत इमारत कशी बांधणी करावी ? याबाबत माहिती दिली.यावेळी संजय जाधव, रिपब्लिकन सेना तालुकाध्यक्ष सचिन कांबळे व तालुका उपाध्यक्ष प्रकाश कांबळे,तालुका संघटक देवकांत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्राणलाल माने, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here